Last Updated on 09 Jun 2023 3:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती व नागपूर या महसुल विभागातील 95 क्षेत्रीय अधिकाऱ्यांना (तहसिलदार/प्रांत) जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे या अधिकाऱ्यांना आता नवीन वाहने मिळणार आहेत.त्यासाठी प्रत्येकी 8 लाख रुपये प्रमाणे एकूण 7 कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चास शासनाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
महसूली क्षेत्रिय अधिकाऱ्यांना नैसर्गिक आपत्ती,टंचाई कालावधीत फिरतीची आवश्यकता लक्षात घेता,त्यांच्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदीस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती व नागपूर महसूली विभागातील क्षेत्रिय कार्यालयाकडून शासनास सादर झाला होता.तद्नुसार एकूण 95 निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदीस मान्यता देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती व नागपूर महसूली विभागातील 95 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 8 लाख रुपये प्रमाणे एकूण रुपये7 कोटी 60 लाख रुपयांच्या खर्चास शासनाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
नवीन वाहन खरेदीवरील खर्च हा सन २०२३ २४ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेच्या माध्यमातून नियोजन विभागाने संबंधित जिल्ह्यांना उपलब्ध करून दिलेल्या लेखाशिषांतर्गत उपलब्ध असलेल्या नियतव्ययातून अथवा संबधित जिल्ह्यांकडील वाहन खरेदीसाठी अनुज्ञेय असलेल्या अन्य लेखाशिर्षांमधील उपलब्ध तरतूदीमधून करण्यात येणार आहे.कोकण विभागातील 12 अधिकाऱ्यांना,पुणे विभागातील 12,नाशिक विभागातील 26,औरंगाबाद 5,अमरावती 11 आणि नागपूर विभागातील 23 अधिकाऱ्यांना ही वाहने मिळणार आहेत.
‘या’ अधिकाऱ्यांना मिळणार नवीन वाहने













































































