Last Updated on 25 Jul 2024 11:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit
👉 खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू
👉 एनडीआरएफच्या पथकांना पाचारण, बोटीही बचाव कार्यात दाखल
👉 नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
👉 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश, नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश
👉 एकता नगर भागातील मदत कार्याचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
👉 पाणी असलेल्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सूचना.
👉 उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश
👉 पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
👉 पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त
👉 पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
पुणे । हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात यासह पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलीका नदी पात्रामध्ये १० हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
मुळशी धरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्त्वाची सूचना
महत्त्वाची सूचना












































































