Last Updated on 08 Jan 2026 6:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच विविध शासकीय आस्थापना यांना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. ही सुट्टी संबंधित विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या मतदारांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.














































































