Last Updated on 05 Feb 2026 7:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 ची मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी एकूण 10 मतमोजणी केंद्रावर होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मतमोजणी केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. तसेच झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करण्यास मनाई केली असून मतमोजणी केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यासही मनाई केली आहे.
हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.
तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे
आटपाडी – दुसरा मजला हॉल, नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ, तासगाव. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.














































































