Last Updated on 16 Jun 2023 10:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बदली आदेश येथे पहा
पोलीस निरीक्षक बदली आदेश (विनंती) PDF मध्ये
येथे क्लिक करा
👇👇👇👇
बदली आदेश (विनंती)
पोलीस निरीक्षक बदली आदेश (सर्वसाधारण) PDF मध्ये
येथे क्लिक करा
👇👇👇👇
बदली आदेश (सर्वसाधारण)
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । बदल्यांच्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या व उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना आज अखेर मुहूर्त मिळाला.राज्यातील 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या.
राज्यातील अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या झाल्या.त्याचबरोबर पोलीस दलातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या.पोलीस उपाधीक्षक,सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या नुकत्याच झाल्या.पण,पोलीस दलातील ठाणेदारांसह सहाय्यक निरीक्षक,उपनिरीक्षक आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित होत्या.महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या काही महिन्यांपासून पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक या पदावरील बदल्या झालेल्या नव्हत्या.
मे महिना हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कालखंड असतो.राज्यातील अजूनही अनेक अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.बदल्यांची यादी तयार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.पण,या बदल्यांना मुहूर्त मिळेना झाला होता.बदल्यांचे घोडे मात्र अडले होते.
पोलीस दलातील ठाणेदारांसह सहाय्यक निरीक्षक,उपनिरीक्षक यांच्या बदल्या या पोलीस महासंचालक स्तरावरील सर्वसाधारण बदली प्रक्रियेनंतर विभागस्तरावरच्या आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरच्या बदल्या अपेक्षित असतात.वेळेत बदल्या झाल्या नाहीत तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा नवीन ठिकाणी राहण्याचा व इतरही प्रश्न निर्माण होणार होता.त्यामुळे वेळेत बदली प्रक्रिया पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
पण,गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस दलात चर्चेत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना अखेर आज मुहूर्त मिळाला.राज्यातील 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या.मुदत पूर्ण झालेल्या 336 आणि विनंतीनुसार 113 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज करण्यात आल्या.अशा एकूण 449 पोलिस निरीक्षांच्या बदल्या पोलिस विभागाने केल्या आहेत.राज्यातील पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत.या जम्बो बदल्यांमुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.आता सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्या लवकरच होतील अशी अपेक्षा आहे.
बदली आदेश येथे पहा
पोलीस निरीक्षक बदली आदेश (विनंती) PDF मध्ये
येथे क्लिक करा
👇👇👇👇
बदली आदेश (विनंती)
पोलीस निरीक्षक बदली आदेश (सर्वसाधारण) PDF मध्ये
येथे क्लिक करा
👇👇👇👇
बदली आदेश (सर्वसाधारण)












































































