Last Updated on 14 Nov 2023 11:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर रोजी करतील जारी
नवी दिल्ली । शेतकऱ्यांसाठी असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट पुढे आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणार्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18,000 कोटी रुपयांचा 15 वा हप्ता जारी करणार आहेत.ज्याचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर 2023 रोजी बिरसा कॉलेज,खुंटी, झारखंड येथे ‘जनजाती गौरव दिवस’ साजरा करतील आणि प्रधानमंत्री किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी करतील.सांस्कृतिक वारसा जतन आणि राष्ट्रीय अभिमान, शौर्य आणि आदरातिथ्य या भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी आदिवासींच्या प्रयत्नांची नोंद घेण्यासाठी दरवर्षी हा जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो.हा कार्यक्रम देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके),आयसीएआर संस्था,राज्य कृषी विद्यापीठे, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे, प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि सामान्य सेवा केंद्रे (CSCs) यांच्या द्वारे प्रसारित केला जाईल.
या योजनेच्या 15 व्या हप्त्यात, 8 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.15 नोव्हेंबर 2023 रोजी एका बटणावर क्लिक करून पंतप्रधानांनी हा हप्ता जारी केला. योजनेच्या सुरुवातीपासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम 2.80 लाख कोटींहून अधिक जाण्याची अपेक्षा आहे.ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर प्रासंगिक गरजा पूर्ण करण्यात मदत करेल.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे वितरण भारत सरकारच्या शेतीला चालना देणे,शेतकर्यांचे सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आणि भारतातील शाश्वत कृषी पद्धतींच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी मंत्रालय विविध कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेत आहे.













































































