Last Updated on 31 Jan 2026 6:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सत्ताधाऱ्यांच्या क्लुप्त्यांपासून सावध राहा, ताकदीने लढा – आ. जयंत पाटील
साखराळे-कापूसखेड गावांतून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार
सांगली ।
पेठ जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवार यावेळी निश्चित मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,असा विश्वास माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी साखराळे, हुबालवाडी येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र करण्याची तीव्र इच्छा होती,त्याअनुषंगाने माझ्या घरी आमच्या दोन-तीन बैठकाही झाल्याचे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी स्व. दादांना श्रद्धांजली अर्पण करत अनेक आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जि. प.उमेदवार उमेदवार श्रीमती मंदाताई भगवान माळी,पं. स. उमेदवार प्रदीप तुकाराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,उमेदवार श्रीमती मंदाताई माळी,प्रदीप पाटील,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील,महिला तालुकध्यक्षा सुनिता देशमाने,माजी सभापती आनंदराव पाटील, ‘राजारामबापू’चे संचालक अतुल पाटील,सरपंच सुजाता डांगे,कापूसखेडचे सरपंच निवृत्ती माळी, कृष्णा कारभारी,संपतराव पाटील,राजारामबापू बँकेचे संचालक राजेश पाटील,सोसायटीचे अध्यक्ष जयदीप पाटील,कामगार नेते तानाजीराव खराडे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. पाटील पुढे म्हणाले,दोन्ही राष्ट्रवादी वेग वेगळ्या झाल्या होत्या,तरी आम्ही एका मर्यादेच्या पलीकडे कधी टीका-टिप्पणी केली नाही. दादांनी सभागृहाच्या कामाकाजात कायम सन्मान ठेवला. सध्या राज्य आणि देशाच्या राजकारणात झपाट्याने बदल घडत आहेत. सत्ताधारी पक्ष ही निवडणूक जिंकण्या साठी सर्व क्लुप्त्या वापरू शकते. आपण गाफिल न राहता, ताकदीने निवडणूक लढवून विजय खेचून आणावा.
विजयराव पाटील म्हणाले,साखराळे व कापुसखेड गावात उमेदवारीवरून चढाओढ होती. मात्र नेतृत्व आणि संघटनेचा निर्णय सर्वांसाठी शिर संवाद्य आहे. लोकनेते राजारामबापू आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी गावाच्या विकासा ला मोठी चालना दिली असून गावातून विक्रमी मताधिक्य देऊ. आम्ही कधीही विकास कामात राजकारण करत नाही. विरोधकांनी अपप्रचार करू नये.
काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील म्हणाले,गावाच्या विकासाला चालना देण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस पक्ष आघाडी धर्म पाळत महा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात मोलाचे योगदान करेल.
सुनिता देशमाने म्हणाल्या,यावेळी पेठ जिल्हा परिषद निवडणुकीत नक्की विजयाचा गुलाल उधळला जाईल आणि ही आ.जयंतराव पाटील यांना वाढदिवसाच्या भेट असेल. यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील,माजी सरपंच बाबुराव पाटील,बँकेचे संचालक राजेश पाटील,माणिकराव पाटील,विनोद बाबर,आनंदराव दवणे यांची भाषणे झाली.
अविनाश पाटील,सचिन पाटील,भास्कर पाटील,जयसिंग डांगे,रामराजे पाटील,शैलेश सूर्यवंशी,पी.बी.सुर्यवंशी,वसंतराव माने,राजेंद्र पाटील,सुनिल पाटील,अलका माने,ताजुद्दीन चौगुले,हुबालावाडीचे बाबुराव हुबाले,सिताराम हुबाले,सरपंच मंगलताई हुबाले,हौसराव भोसले, राजेंद्र हुबाले,संजय हुबाले,रेखाताई पवार,तसेच अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
मताधिक्याची चढाओढ…
साखराळे व कापुसखेड गावातील कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात आपले गांव मताधिक्य देण्यात पुढे राहील,असा विश्वास व्यक्त केला. यावर आ. जयंतराव पाटील यांनी साखराळे गांव मताधिक्य देण्यात अग्रेसर राहील,मात्र बघू कोण बाजी मारतो,अशी टिप्पणी केली.












































































