Last Updated on 13 Mar 2024 10:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गांवरील Paytm FASTag (पेटीएम फास्टॅग) वापरकर्त्यांना विनाखंडित प्रवासाचा अनुभव मिळावा, आणि टोल प्लाझावर त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या प्रवाशांनी 15 मार्च 2024 पूर्वी दुसऱ्या कोणत्याही बँके द्वारे जारी करण्यात आलेला नवीन FASTag घ्यावा, अशी सूचना एनएचएआय (NHAI), अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना द्यावा लागणारा दंड अथवा दुप्पट शुल्क आकारणी टाळायला मदत होईल.
पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंधांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना 15 मार्च 2024 नंतर त्यांच्या फास्टॅग खात्यामध्ये रिचार्ज अथवा बॅलन्स टॉप-अप करता येणार नाही. तथापि, त्यांना निर्धारित तारखे नंतर टोल भरण्यासाठी त्यांची शिल्लक रक्कम वापरता येईल.
पेटीएम फास्टॅग शी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी अथवा सहाय्यासाठी, वापरकर्ते त्यांच्या संबंधित बँकांशी संपर्क साधू शकतील अथवा IHMCL वेबसाइटवर दिलेली प्रश्नोत्तरे (FAQ) पाहू शकतील. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांनी सक्रियपणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन एनएचएआयने केले आहे.
या 39 बँका वर शिफ्ट करू शकता तुमचा फास्टैग
एअरटेल पेमेंट्स बँक
अलाहाबाद बँक
एयू स्मॉल फायनान्स बँक
ॲक्सिस बँक लि
बंधन बँक
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
सिटी युनियन बँक लि
कॉसमॉस बँक
डोंबिवली नागरी सहकारी बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
फेडरल बँक
फिनो पेमेंट बँक
एचडीएफसी बँक
आयसीआयसीआय बँक
IDBI बँक
आयडीएफसी फर्स्ट बँक
इंडियन बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
इंडसइंड बँक
J&K बँक
कर्नाटक बँक
करूर वैश्य बँक
कोटक महिंद्रा बँक
लिव्हक्विक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
नागपूर नागरी सहकारी बँक लि
पंजाब महाराष्ट्र बँक
पंजाब नॅशनल बँक
सारस्वत बँक
दक्षिण भारतीय बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया
सिंडिकेट बँक
द जळगाव पीपल्स को-ऑप. बँक
त्रिशूर जिल्हा सहकारी बँक
युको बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
येस बँक













































































