Last Updated on 01 Jan 2026 11:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
आशा, संकल्प आणि सकारात्मकतेचा नवा प्रारंभ
काळाचे चक्र फिरत राहते, पण काही क्षण आयुष्याला नवी दिशा देणारे ठरतात. नवे वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरवरची तारीख बदलणं नाही, तर मनात नव्या आशा आणि नव्या संकल्पांची पालवी फुटण्याचा तो एक विलक्षण क्षण असतो. २०२६ हे वर्षही अशीच नवी पहाट घेऊन आलं आहे. ज्यात आनंद असावा, सुखसमृद्धी नांदावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात समाधानाचा उजेड पसरावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
मागील वर्षाने दिलेले अनुभव, शिकवण आणि आव्हानं सोबत घेऊन पुढे जाताना, नववर्ष आपल्याला पुन्हा एकदा सकारात्मकतेची वाट दाखवतं. वैयक्तिक आयुष्यात असो वा समाजजीवनात आशावाद, सहकार्य आणि विश्वास यांवर उभं राहिलेलं वर्षच खऱ्या अर्थाने समृद्ध ठरतं.
नवीन वर्षाचा खरा अर्थ केवळ मोठ्या संकल्पांमध्ये नसून, रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या सकारात्मक बदलांत दडलेला आहे. परस्परांबद्दलचा आदर, कुटुंबातील जिव्हाळा, समाजातील सलोखा आणि देशासाठी काहीतरी चांगले करण्याची जिद्द यातूनच खऱ्या अर्थाने समाजात सुखसमृद्धी नांदणार आहे.
2026 मध्ये शिक्षण, उद्योग, शेती, तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांत नवनवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः तरुणाईसाठी हे वर्ष स्वप्नांना दिशा देणारं ठरावं, नव्या कल्पनांना वाव देणारं ठरावं आणि मेहनतीला योग्य फळ मिळवून देणारं असावं, हीच भावना सर्वत्र दिसून येते.
नवीन वर्षाचा खरा अर्थ केवळ मोठ्या संकल्पांमध्ये नसून, रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या सकारात्मक बदलांत दडलेला आहे. परस्परांबद्दलचा आदर, कुटुंबातील जिव्हाळा, समाजातील सलोखा आणि देशासाठी काहीतरी चांगलं करण्याची उमेद यातूनच आनंद आणि सुखसमृद्धी नांदते.
नेहमीच सत्याच्या आणि सकारात्मकतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या ‘अधोरेखित’ कडून आपल्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण वाढवो, चिंता कमी करो आणि यश, समाधान व शांततेनं भरलेलं ठरो हीच सदिच्छा.
![]()
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jan 2026 7:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरा... Read more
![]()












































































