Last Updated on 14 Sep 2024 10:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
India vs Pakistan Hockey Asian Champions Trophy 2024 : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भारतीय संघाने पराभवाची धूळ चारलीआहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंहने कमाल करताना दोन गोल केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी खेळवण्यात आला. स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पाचवा विजय आहे. आता भारताने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे.
आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत विजयी घोडदौड सुरूच ठेवली. आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचपैकी पाच सामने जिंकून भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. हा गोल पहिल्या क्वार्टरमध्ये 8 व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद नदीमने केला. सुरूवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानचे त्यानंतर टीम इंडियापुढे काहीच चालले नाही. त्यांना केवळ एकच गोल करता आला.
सामन्यात पिछाडीवर असलेल्या कर्णधार हरमनप्रीत सिंहने 13 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. हा गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून करण्यात आला. या पद्धतीने पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान 1-1 असे बरोबरीत राहिले.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने भारतासाठी दुसरा गोल १९व्या मिनिटाला केला. कर्णधाराने दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. आता भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. भारताची ही आघाडी कायम राहिली. टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला.
‘सरपंच’ ठरला विजयाचा हिरो
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला कर्णधार हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली. अभिषेकच्या इंजेक्शनवर हरमनप्रीतने गोलपोस्टच्या मध्ये शामदार गोल मारला. जो निर्णायक ठरला.










































































