Last Updated on 29 Jun 2022 12:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाईल अॅप) सुरू करण्यात आले असून सदर उपयोजक गूगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध आहे.
अलीकडेच एमपीएससीकडून ट्विटरसारख्या समाजमाध्यमाचा वापर सुरू करण्यात आला आहे. मात्र स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने उमेदवारांना सुलभतेने माहिती देण्यासाठी ‘एमपीएससी’ या स्वतंत्र मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या अँड्रॉईड प्रणालीसाठीचे ॲप विकसित करण्यात आले आहे.
प्रगत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून उमेदवारांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. उमेदवारांना सध्या अर्ज करण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. त्यामुळे उमेदवाराकडे संगणक किंवा लॅपटॉप नसल्यास सायबर कॅफेत जावे लागते. मात्र आता ॲपद्वारे उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवरच सर्व माहिती मिळेल.











































































