Last Updated on 07 Aug 2024 2:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या PSI परीक्षा पात्र उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्ष वाढवण्यात यावी यासाठी आ. सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
यावेळी आ. सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कम्बाईन ग्रुप बी व सी (पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक व सहाय्यक) या पदांसाठी सन २०१४ व २०१५ मध्ये सदर परिक्षेची जाहिरात काढण्यात आली नव्हती.त्याचबरोबर परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला.त्यानंतर सन २०२० व २०२१ ही दोन वर्षे कोरोनामुळे भरती प्रक्रिया होवू शकलो नाही.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून PSI परीक्षा भरती प्रक्रियेवाचत खालील मुद्दे या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले गेले आहेत.
१) सन २०२२ च्या भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी मे २०२४ मध्ये घेण्यात आली.
२) त्याची शारिरीक चाचणी व मुलाखत अजून झालेली नाही.
३) PSI mains परिक्षा २०० मार्काऐवजी ४०० मार्काची करण्यात आली व अभ्यासक्रमातून कायदा विषय काढून टाकण्यात आला.
४) मुख्य पेपर २ मधील जो नवीन अभ्यासक्रम आहे तो इतर परिक्षेच्या तुलनेत PSI पदासाठी नवीन होता तसेच PSI पदासाठीची भरती प्रक्रिया, पात्रता, इतर पदांच्या तुलनेत भिन्न आहे.
५) अराजपत्रित गट व व गट क MPSC च्या इतर सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे इतकी आहे. मात्र PSI साठी कमाल वयोमर्यादा ३१ वर्ष व मागासवर्गीयांसाठी ३४ वर्ष इतकी आहे.

त्याचवरोवर मार्च २०२४ मध्ये निघणारी PSI परिक्षेची जाहिरात लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे काढण्यात आलेली नाही.या सर्व प्रक्रियेला विलंब होत असलेने PSI परिक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमानामुळे वरेचसे विद्यार्थी अपात्र होणार आहेत.परिणामी अशा विद्याथ्यांमध्ये शासनावद्दल नाराजी व असंतोष पसरत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या PSI परिक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्ष वाढविण्यावावत विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या PSI परिक्षा पात्र विद्यार्थ्यांच्या वरील वावींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन PSI परिक्षेसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेची अट दोन वर्षांनी वाढविण्यावावत शासन स्तरावर योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.












































































