Last Updated on 24 Jun 2022 6:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून 2 हजार 25 गुण असे सुधारित योजनेचे स्वरुप आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन अर्थात सी सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती.या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी,माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर,माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती.या समितीच्या शिफारसीनुसार सी सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता.या संदर्भातील समितीच्या शिफारसीही MPSC ने स्विकारल्या आहेत.

MPSC NEW SYLLABUS













































































