Last Updated on 19 Jul 2024 2:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Microsoft Outage : जगभरातील बऱ्याच लोकांना त्यांच्या विंडोज सिस्टमवर निळ्या स्क्रीनची समस्या भेडसावत आहे.मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद झाल्यामुळे जगभरातील बँकांपासून एअरलाइन्सपर्यंतच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत.मायक्रोसॉफ्ट क्लाउड डाऊन झाल्यामुळे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जगभरातील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
अलीकडेच करण्यात आलेल्या क्राउड स्क्रीम अपडेटनंतर ही समस्या येत आहे. या समस्येने मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांची क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आउटेजमुळे जगातील अनेक बँकांचे कामही ठप्प झाले आहे. याशिवाय आउटेजवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. अनेक मीडिया हाऊसची वेबसाईटही ठप्प झाल्याची बातमी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायांचे आयटी नेटवर्क प्रभावित झाले आहे.
अनेक युजर्स याबाबत तक्रार करत आहेत. या समस्येमुळे लाखो युजर्सवर मोठा परिणाम झाला आहे. बरेच युजर्स तक्रार करत आहेत की त्यांची सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा त्यांना ब्लू स्क्रीन समस्येचा सामना करावा लागत आहे.
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली. ज्यामुळे स्टोरेज आणि कॅप्यूटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. त्याचा परिणाम कनेक्टिव्हिटी फेलियरमध्ये झाला. आता ही अडचण तुम्हाली आली असणार तर ती दूर कशी करावी याची माहितीही मायक्रोसॉफ्टने दिली.












































































