Last Updated on 12 Jun 2023 12:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कुठे आणि कसा पाहाल निकाल? जाणून घ्या तपशील
मुंबई । MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार होता. मात्र त्या आधीच हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.आता निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली आहे.
पीसीएम (फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) या ग्रुपसाठी परीक्षा 9 ते 14 मे दरम्यान घेण्यात ली होती. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) या ग्रुपसाठी परीक्षा 15 ते 20 मे दरम्यान झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे.या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.
यावर्षी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) ग्रुपसाठी होणारी सीईटी 9 ते 13 मे कालावधीत पार पडली.3 लाख 3 हजार 48 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी 2 लाख 77 हजार 403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 25 हजार 645 विद्यार्थी गैरहजर होते. तर पीसीबी (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र) ग्रुपची सीईटी 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली. या परीक्षेला 3 लाख 33 हजार 41 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 13 हजार 732 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 19 हजार 309 विद्यार्थी गैरहजर होते. आज निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली आहे..
असा पाहा MHT CET 2023 निकाल?
- निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या
- cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा
- त्यानंतर Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा
- रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा
- रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा
समुपदेशनासाठी मोबाइल अॅप
यंदा एमएचटी सीईटीची समुपदेशन प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी प्रथमच मोबाइल अॅपचा वापर केला जाणार आहे. उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती, आवश्यक सूचना व जागांची माहिती मिळेल. हे अॅप विद्यार्थी व पालकांना दोघांनाही वापरता येणार आहे.






































































