Last Updated on 01 Mar 2026 4:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
नेर्ले येथील ‘मम्मा प्री-स्कूल’मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
उद्घाटन स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. दर्शु जगताप व संस्थेचे पदाधिकारी संदीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित ओजस्वी नाटिका सादर केली. यासोबतच गोंधळ, वाघ्या-मुरळी, कोळी नृत्य आणि वेस्टर्न डान्स अशा विविध कलागुणांचा आविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केला.

या कार्यक्रमासाठी स्कूलमधील शिक्षिका श्रद्धा जाधव, प्राजक्ता पाटील, प्रज्ञा बल्लाळ, श्वेता गावडे, मयुरी बल्लाळ, लक्ष्मी माने, अश्विनी जगताप आणि डान्स शिक्षिका पायल पाटील यांनी विद्यार्थ्यांना वेशभूषा व नृत्याचे प्रशिक्षण दिले. स्कूलमधील वाहतूक व्यवस्थापक कमिटीच्या वतीने प्रिन्सिपल व पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विनायक जगताप यांनी केले. पालकांच्या भरघोस प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.














































































