Last Updated on 25 Feb 2026 7:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे विधानसभेत निवेदन
सुमारे ५.१६ लाख शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
मुंबई ।
राज्य शासकीय व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ५५ टक्क्यावरून ५८ टक्के अशी ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे निवेदन वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केले.
राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५.१६ लाख शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी निवेदनात सांगितले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jul 2026 8:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ ह... Read more













































































