Last Updated on 17 Jan 2026 4:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले, माजी आ.सदाभाऊ पाटील, जेष्ठ नेते दिलीपराव पाटील, राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, राजाराम बापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, बाजार समितीचे सभापती डॉ.अशोक पाटील यांच्यासह तालुक्यातील, जिल्ह्यातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्याचे दर्शन घेत अभिवादन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, जतचे माजी सभापती मन्सूर खतीब, माजी जि.प.सदस्य राजेंद्र पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, राजारामबापू सह.बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू दुध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, प्राचार्य आर.डी.सावंत, अँड बाबासाहेब मुळीक, संग्राम देशमुख, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, प्रदेश सदस्या कमल पाटील, जेष्ठ नेते भीमराव पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, स्वरूपराव पाटील, विश्वासराव पाटील, सी.व्ही.पाटील, शिवाजी वाटेगावकर, सुरेश माने, शिवाजी माने चरेगाव, चारुदत्त डुबल कराड, सतिश पाटील अंकलखोप, जयदीप यादव कडेपूर, कसबे डिग्रजचे स्वप्नील नलवडे, संजय चव्हाण, आबा सायमोते, दूधगांवचे उपसरपंच अविनाश भोसले, विलास आवटी, सर्जेराव देशमुख, उदय शिंदे, अरुण कांबळे, संभाजी जाधव, माणिकराव पाटील, दिलीपराव पाटील, माणिक शेळके, नगरसेवक संग्राम पाटील, संग्राम जाधव, देवराज देशमुख, उमेश पवार, अविनाश खरात, शिवाजी आटूगडे, अनिल पावणे, कार्यकारी संचालक आर. डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील, कामगार नेते राजेंद्र चव्हाण, विकास पवार तसेच कारखान्याचे संचालक, अधिकारी, कामगार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.












































































