Last Updated on 20 Sep 2025 9:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आले आहे. त्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी अनिवार्य केली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक महिला व बाल विकास विभागाने जारी केले असून, पुढील दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC साठी आवश्यक असणारी कागदपत्रं
1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
2. लाभार्थी महिलेचा फोटो
3. उत्पन्नाचा दाखला
– वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक
4. विवाह प्रमाणपत्र
– महिलेचे नाव रेशन कार्डवर नसेल किंवा महिला नवविवाहिती असेल तर विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे.
5. आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील
6. लाभार्थी महिलेचे हमीपत्र
7. अधिवास प्रमाणपत्र
– अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर तुम्ही खालीलपैकी कोणतेही कागदपत्रं अपलोड करू शकता:
– 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड
– 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र
– जन्म प्रमाणपत्र
– शाळा सोडल्याचा दाखला
लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी पूर्ण करायची?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश
e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा फ्लोचार्ट, जाणून घ्या

Post Views: 475