Last Updated on 04 Aug 2023 1:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली
निरा देवघर धरण 94 टक्के तर 84 टक्के भरले
सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.कोयना धरण भरत आले असून आज सकाळी 8 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 79.70 टीएमसी (76 टक्के) इतका झाला होता.हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 25.55 टीएमसी पाण्याची गरज आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.यामुळे पाणीसाठ्यात दररोज सरासरी चार ते पाच टीएमसीने वाढ होत आहे.
हेही वाचा – प्रत्येक आमदाराला मिळणार एवढ्या आकाराचा फ्लॅट
गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 50 मिलिमीटर,नवजाला 116 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जलाशयात प्रतिसेकंद 19 हजार 297 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.ही आकडेवारी 4 ऑगस्ट 2023 सकाळी 8 पर्यंतची आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 25.55 टीएमसी पाण्याची गरज आहे.कोयना पायथा विद्युत गृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर । जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 5 व 6 उघडले आहेत. त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.
भोगावती नदीवरील – तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची व शिगांव.
दुधगंगा नदीवरील – दत्तवाड
कासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे असे 22 बंधारे पाण्याखाली आहेत.
पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 29 फूट, सुर्वे 28.7 फूट, रुई 57.9 फूट, इचलकरंजी 54.6, तेरवाड 48.9 फूट, शिरोळ 41.6 फूट, नृसिंहवाडी 41 फूट, राजापूर 29.3 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 14.3 फूट व अंकली 19.4 फूट अशी आहे.
जिल्ह्यातील धरण पाणीसाठा
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजता प्राप्त अहवालानुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आली आहे.
राधानगरी – 8.28 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.44 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.17 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 19.37 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.53 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.35 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 3.22 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.17 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.79 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.21 (1.240 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.21 (0.214).
निरा देवघर धरण 94 टक्के तर 84 टक्के भरले
पुणे । निरा देवघर धरण 94 टक्के आणि वीर धरण 84 टक्के भरले आहे.पाऊस असाच सुरू राहिल्यास निरा देवघर धरणातून विसर्ग सुरू करावा लागेल.तो विसर्ग थेट वीर धरणात येत असल्याने वीर धरण भरण्याची शक्यता आहे. पूरनियंत्रण करण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडावे लागू शकते. निरा व भीमा नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे.नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. पाणी सोडण्यात आल्यानंतर कोणीही नदीपात्रात जावू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी)
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/10’11”
2) बहे पूल-(23.7)/6’9″
3) ताकारी पूल (46)/16’00”
4)भिलवडी पूल – (53)/15’04”
5)आयर्विन- (45)/14’3″
6)राजापूर बंधारा-(58)/29’03”
7) राजाराम बंधारा-(43)/29’07”
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 14182
2) आयर्विन पूल – 19380
3) राजापूर बंधारा-69000
4) राजाराम बंधारा -28270
5) कोयना धरण-79.70 TMC/2100
6) वारणा धरण-29.17 TMC/8575
7)अलमट्टी धरण- 117.04TMC
आवक – 87841
जावक- 42000









































































