Last Updated on 18 Aug 2025 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, 18 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 3 फुटांवरून 5 फुटापर्यंत उघडून 33,000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 96.87 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 92.03 टक्के भरले आहे.
दरम्यान, आज रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 3 फुटांवरून 5 फुटापर्यंत उघडून 33,000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 35,100 क्युसेक विसर्ग सुरू होईल.
सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात पाऊस सुरु आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 45 हजार 082 क्युसेस अशी सुरू आहे.सोमवारी (18 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंतआलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 96.87 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 92.03 टक्के भरले आहे. पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : राज्यात पुढील 24 तासासाठी या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
कोयना तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 35 मिलिमीटर, नवजा येथे 57 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 64 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 93.02 टीएमसी इतका झाला असून धरण 88.38 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 501 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 176 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 116 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा…
राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 21 Jan 2026 1:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्... Read more















































































