Last Updated on 25 Aug 2025 6:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज २५ ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फुटांवरून 2 फुटापर्यंत उघडून 16,800 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 18,900 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.
महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात पाऊस सुरु आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 17 हजार 456 क्युसेस अशी सुरू आहे. कोयना धरणात 101.13 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 96.09 टक्के भरले आहे. पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 25 मिलिमीटर, नवजा येथे 23 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 26 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 101.13 टीएमसी इतका झाला आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 099 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 999 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 768 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































