Last Updated on 08 Jan 2026 5:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्व. जयवंतराव भोसले यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजन
साई सेवा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर उपविजेता
सातारा ।
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमीत्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी संघाने अजिंक्यपद पटकावले. तर साई सेवा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर संघ स्पर्धेत उपविजेता ठरला. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषीक वितरण करण्यात आले.
यावेळी संचालक जितेंद्र पाटील, शिवाजी पाटील, जे डी मोरे, अविनाश खरात, धोंडीराम जाधव ,मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पवार, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवमुद्रा क्रीडा मंडळ कौलव संघाने तृतीय क्रमांक तर प्रकाश तात्या बालवडकर क्रीडा मंडळ पुणे या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. साई सेवा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर संघाचा राहुल टेके हा अष्टपैलू खेळाडू ठरला. शिवमुद्राचा साहिल पाटील उत्कृष्ट चढाईचा मानकरी तर वाघजाई संघाचा साईराज कुंभार उत्कृष्ट पकडचा मानकरी ठरला.
रुपेश जाधव यांनी स्पर्धेचे पंचप्रमुख, रमेश देशमुख यांनी साहाय्यक म्हणून तर शशिकांत यादव यांनी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, प्रा.अमोल मंडले, राहुल निकम, आबासो यादव, प्रा. महेश कुंभार आदींनी स्पर्धेचे संयोजन केले. याप्रसंगी हेमंत धर्मे, राजेंद्र दुर्गावळे, विक्रम साळुंखे, वसंतराव पवार, कृष्णत कापूरकर, धनंजय मोहिते, सदाशिव कदम, सुरेश साळुंखे, प्रदीप साळुंखे, व्यंकटराव जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंची उपस्थिती
देशातील नामांकित प्रो- कबड्डी स्पर्धेत दबंग दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या अजिंक्य पवार, सुशांत साईल आणि पाटणा पायरेट्स कडून खेळणाऱ्या शुभम शिंदे आणि साहिल पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थिती होती. त्यांचा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.









































































