Last Updated on 20 Sep 2021 1:54 AM by Sanjay Patil/Adhorekhit
दुबई : आयपीएलच्या १४ व्या सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला.या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज अशी नाबाद 88 धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वात चेन्नई आणि मुंबई यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याची सुरुवात झाली आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सामन्याला सुरुवात केली.रोहित शर्माच्या जागी किरोन पोलार्ड संघाचे नेतृत्व केले. पोलार्ड मुंबईचे नेतृत्व करत असल्याची ही सहावी वेळ आहे. चेन्नईने 20 षटकांमध्ये 6 विकेटच्या नुकसानसह 156 धावा काढल्या.
मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य होते,पण संघाला केवळ 136/8 धावा करता आल्या आणि चेन्नईने सामना 20 धावांनी जिंकला.या विजयासह धोनी आणि कंपनी 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहेत.चेन्नईच्या विजयात ड्वेन ब्राव्होने जास्तीत जास्त 3 बळी घेतले.
चेन्नईच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर म्हणून गौैरवण्यात आले.
दुबई सात वर्षांनंतर समोरासमोर
आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान मुंबईने 19 आणि चेन्नईने 12 जिंकले. याआधी आज दुबईमध्ये 2014 मध्ये दोन्ही संघांची आमनेसामने झाली होती, तेव्हा चेन्नईने मुंबईचा 7 गडी राखून पराभव केला होता.
या विजयासह चेन्नईने आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध २१८ धावा करूनही सामना जिंकता आला नाही.मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.
दोन्ही संघ
मुंबई इंडियंस: क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, कीरोन पोलार्ड (कप्तान), सौरभ तिवारी, कुणाल पंड्या, एडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
चेन्नई सुपर किंग्स: फाफ डु प्लेसिस, रुतुराज गायकवाड़, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कप्तान/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेजलवुड.
| TEAMS | |||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1
![]() CHENNAI SUPER KINGS |
8 | 6 | 2 | 0 | 0 | 12 | 1.223 | ||
2
![]() DELHI CAPITALS |
8 | 6 | 2 | 0 | 0 | 12 | 0.547 | ||
3
![]() ROYAL CHALLENGERS BANGALORE |
7 | 5 | 2 | 0 | 0 | 10 | -0.171 | ||
4
![]() MUMBAI INDIANS |
8 | 4 | 4 | 0 | 0 | 8 | -0.071 | ||
5
![]() RAJASTHAN ROYALS |
7 | 3 | 4 | 0 | 0 | 6 | -0.190 | ||
6
![]() PUNJAB KINGS |
8 | 3 | 5 | 0 | 0 | 6 | -0.368 | ||
7
![]() KOLKATA KNIGHT RIDERS |
7 | 2 | 5 | 0 | 0 | 4 | -0.494 | ||
8
![]() SUNRISERS HYDERABAD |
7 | 1 | 6 | 0 | 0 | 2 | -0.623 |

















































































