Last Updated on 23 Jun 2023 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे.तसेच एकदिवसीय मालिकेचे उपकर्णधारपद हार्दिक पांड्या तर कसोटीचे उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कसोटीत मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले असून जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला देखील विश्रांती देण्यात आली आहे. तसेच ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी मुकेश कुमार आणि नवदीप सैनीवर असणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघामध्ये सूर्यकुमार यादवचे स्थान कायम ठेवण्यात आले असून यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन आणि संजू सॅमसन यांची निवड झाली आहे. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची जबाबदारी राहणार असून त्यांच्या साथीला अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा असणार आहेत.तसेच वनडे मालिकेत जलदगती गोलंदाजीची धुरा उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमारवर असेल.
असे आहे वेळापत्रक
येत्या 12 जुलैपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी,3 एकदिवसीय आणि 5 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार असून पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 3 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)
12 ते 16 जुलै 2023 : पहिला कसोटी सामना
ठिकाण : विंडसर पार्क, डोमिनिका
20 ते 24 जुलै 2023 : दुसरा कसोटी सामना
ठिकाण : क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद
वनडे सामने – (संध्याकाळी सात वाजता)
27 जुलै 2023 : पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
29 जुलै 2023 : दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
1 ऑगस्ट 2023 – तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकॅडमी, त्रिनिदाद
टी-20 सामने– (संध्याकाळी सात वाजता)
पहिला टी20 सामना – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी20 सामना – 6 ऑगस्ट, गुयाना
तिसरा टी20 सामना – 8 ऑगस्ट, गुयाना
चौथा टी20 सामना – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी20 सामना – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
वनडे मालिकेचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.











































































