Last Updated on 04 Feb 2025 10:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहे. मंगळवारी ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली त्यात प्रवीण दराडे, राहुल कर्डिले, डॉ. प्रशांत नारनवरे आदींचा समावेश आहे.
नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पर्यावरण विभागातून बदली झाल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि पणन विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. सध्या सहकार विभागाचा अतिरिक्त कार्यभार नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे आहे. दराडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी ओळखले जातात.
तर राज्यपालांचे सचिव म्हणून डॉ. प्रशांत नरनावरे यांची बदली करण्यात आली आहे. तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. राहुल कर्डिले यांची आता नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
जाणून घ्या कोणाची बदली कुठे झाली?
1. प्रवीण दराडे यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
2. पंकज कुमार यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. नितीन पाटील सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्वेता सिंघल राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. डॉ. प्रशांत नरनावरे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. अनिल भंडारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7.पी.के.डांगे आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
8. एस. राममूर्ती , सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. अभिजित राऊत जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. मिलिंदकुमार साळवे सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
11. राहुल कर्डिले सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. माधवी सरदेशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. अमित रंजन सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































