Last Updated on 02 May 2023 10:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात एकूण १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.यामध्ये जी. श्रीकांत, पी. शिवशंकर व तुकाराम मुंडे आदि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे.त्यांच्याकडे कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.जी श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. तर, पी शिवशंकर शिर्डी संस्थानचे नवे सीईओ असतील.
बदल्यांचे आदेश खालीलप्रमाणे
1. डॉ. नितीन करीर यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सध्या ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
2. मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्याPS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
4. 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
7. तुकाराम मुंडे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त असणारे जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत.
9. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.












































































