Last Updated on 25 Aug 2025 3:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सद्या जोरदार तयारी सुरु आहे. पूर्णपणे ब्राऊन (तपकिरी) तसेच शुभ्र रंगातील गणेश मूर्तीना मागणी असल्याचे दिसत आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग होत आहे. गणेश उत्सवात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापणेसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पूर्णपणे ब्राऊन (तपकिरी) तसेच शुभ्र रंगातील गणेश मूर्तीना वाढती मागणी असल्याचे मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.शाडूच्या लहान मूर्ती साधारण ७५० रुपये तर मोठ्या मूर्तींची किंमत सुमारे पाच हजारांपर्यंत आहे.
हेही वाचा : महत्वाच्या बातम्या – अधोरेखित
‘दगडूशेठ’ आणि ‘लालबागचा राजा’ या मूर्ती एव्हरग्रीन आहेत आणि याच मूर्तीना ग्राहकांकडून जास्त प्रमाणात मागणी आहे. साईबाबा रुपात, स्वामी समर्थ, लालबाग, सनातन, बजाप,चिंतामणी, महाराज, बाल गणपती, पाटील, विठ्ठल मूर्ती, ज्ञानेश्वरी या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींनाही मागणी आहे. गणपतीच्या विविध रूपातील मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या आकर्षक व सुबक गणेश मूर्ती सध्या सर्वांचे आकर्षण आहे.
साधारणतः एक फुटांपासून तीन फुटापर्यंत शाडूच्या मुर्ती उपलब्ध असल्याचे मुळचे बहे येथील आणि सद्या इस्लामपुर येथे वास्तव्यास असलेले मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.









































































