Last Updated on 15 Sep 2024 11:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा राज्यातील खरीप हंगाम 2024 मधील शेतकरी स्तरावरील ई – पीक पाहणी करिता मुदतवाढ देणे संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून निर्गमित झाला आहे.
सदर परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्या प्रति जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रक राज्यस्तरीय नियंत्रण समिती यांच्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला आहे.
सदरच्या पत्रकामध्ये नमूद आहे की , सन 2024-25 या खरीप हंगाम मधील ई- पीक पाहणी या ॲप्समध्ये ऑनलाइन मोबाईलच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी 15 सप्टेंबर.2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती .परंतु राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस यामुळे शेतकरी स्तरावरील ई – पिक पाहणीचे कामकाज पूर्ण झालेले नाहीत,असे निदर्शनास आले असून सद्यस्थितीमध्ये सदर ईपीक पाहणी अंतर्गत शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद खूप कमी प्रमाणात झाल्याची दिसून आली आहे.
यामुळे राज्य शासनाकडून खरीप हंगाम 2024 साठी 07 दिवसांची म्हणजेच दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई – पीक पाहणी नोंद करिता मुदतवाढ देण्यात येत आहे .त्याचबरोबर तलाठी/सहाय्यक स्तरावरील ई – पीक पाहणी मुदत दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ई- पीक पाहणीची खरीप हंगाम 2024 करिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंद करता येणार आहेत . सदरची नोंद करणे अत्यावश्यक आहे , याशिवाय राज्य शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई , मदत निधी दिली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर नोंद करणे आवश्यक असणार आहे.






































































