Last Updated on 21 Jan 2026 4:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी निश्चित कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकरी स्तरावरील रब्बी ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६ पर्यंत असून, या कालावधीत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील रब्बी पिकांची ई-पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
निर्धारित मुदतीनंतर ई-पीक पाहणी करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता दिलेल्या कालावधीतच ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी पूर्ण न झाल्यास भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर बहेच्या मंडळ अधिकारी उषा गवळे व ग्राम महसूल अधिकारी गणेश हुबाले यांनी सर्व शेतकरी बांधवांना वेळेत रब्बी ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.












































































