Last Updated on 26 May 2024 10:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे खायचं असेल तर,तुम्ही बटाटा बाइट्सची सोपी रेसिपी ट्राय करू शकता.उकडलेल्या बटाट्यापासून पराठ्याऐवजी पोटॅटो बाइट्स वापरून तुम्ही नाश्त्यामध्ये वेगवेगळे आणि चविष्ट स्नॅक्स सर्व्ह करू शकता. यावेळी पोटॅटो बाइट्स बनवून तुम्ही फक्त नाश्त्यात काहीतरी नवीन करून बघू शकत नाही तर काही मिनिटांत क्रिस्पी आणि तिखट स्नॅक्सचाही आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया बटाटा बाइट्सच्या सोप्या रेसिपीबद्दल…
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स
लागणारी सामग्री
- दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- चार चमचे कॉर्न फ्लॉवर
- चवीपुरते मीठ
- अर्धा चमचा लाल मिरची पावडर
- अर्धा चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा ओरीगॅनो
- तळण्यासाठी खाद्य तेल
- पाच-सहा लसूण पाकळ्या
हेही वाचा – नाचणी,बाजरी,ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !
कृती
प्रथम बटाटे उकडून घेतले नंतर सालं काढून मॅश करून घेतले.नंतर त्यात चवीनुसार मीठ,चार चमचे कॉर्न फ्लॉवर,अर्धा चमचा लाल मिरची पावडर,अर्धा चमचा गरम मसाला,अर्धा चमचा ओरीगॅनो,क्रश करून पाच-सहा लसूण पाकळ्या घाला.ते सर्व एकजीव करून घ्या.व त्याचा घट्टसर गोळा करून घ्या..त्यानंतर हाताला खायचे तेल लावून त्याचे लहान-लहान गोळे बनवा.कढईत तेल टाकून मध्यम आचेवर हे बाइट्स लालसर होईपर्यंत टाळून घ्या.एवढ्या साहित्यात २०-२५ बाइट्स बनतात.तळून झाल्यानंतर खाण्यासाठी टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा पोटॅटो बाईट्स.
![]()
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स : सोप्या भाषेतील हा व्हिडीओ
![]()












































































