Last Updated on 25 Oct 2021 7:26 AM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली :
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता.करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ३०६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ४४३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १८ हजार ७६२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
देशातील एकूण रुग्ण संख्या ०३ कोटी ४१ लाख ८९ हजार इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ५४ हजार ७१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ४५ लाख ६७ हजार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी आहे. एकूण १ लाख ६७ हजार ६९५ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नव्या व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळून आल्याचं वृत्त एका संस्थेने दिले आहे.













































































