Last Updated on 06 Aug 2023 11:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Chandrayaan-3 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे.भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेले हे पहिले यश आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेतील चंद्राचे दृश्य,जेव्हा ते 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत स्थापित केले जात होते.
चांद्रयानाने अवकाशातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे,ज्यामध्ये अप्रतिम दृश्य दिसले.चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत कसे प्रवेश करत आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.व्हिडिओच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये चंद्र निळ्या-हिरव्या रंगात दाखवण्यात आला आहे.चंद्रावरही अनेक खड्डे दिसत आहेत.इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली आहे.ISRO ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्ट दिसत आहे.
यापूर्वी चंद्राच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चांद्रयान-3 ने शुक्रवारी म्हणजेच 4 जुलै रोजी पृथ्वी आणि चंद्रामधील दोन तृतीयांश पेक्षा जास्त अंतर कापले होते.एका दिवसानंतर म्हणजे 5 ऑगस्ट रोजी तो चंद्राच्या कक्षेत दाखल झाला.चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.चांद्रयान-3 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास तिसऱ्या चंद्राच्या कक्षेत समाविष्ट केले जाईल.यानंतर 14 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी अनुक्रमे चौथी आणि पाचवीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरणार
चांद्रयान-3 चा प्रवास पूर्ण करण्यासाठी आणखी 18 दिवस लागतील.23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंगचा हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे.हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर अमेरिका,रशिया,चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे.चंद्रयान-3 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावले आहे.
https://twitter.com/i/status/1688215948531015681












































































