Last Updated on 27 Jan 2026 11:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी निश्चित परिवर्तन होईल,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी बहे, मसुचीवाडी येथे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. राज्य सरकारने गेल्या ४ वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न घेता प्रशासकाच्या आडून कारभार करण्याचे पाप केले असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.
यावेळी बोरगाव जि.प.च्या उमेदवार सौ.कांता वाटेगावकर, ताकारी पं.स.च्या उमेदवार सौ.रुपाली सपाटे आणि बोरगाव पं.स.चे उमेदवार मनोज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. स्व.बापू बिरू वाटेगावकर यांचे सुपुत्र शिवाजी वाटेगावकर (महाराज), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, संचालक विठ्ठल पाटील, माजी संचालक माणिकराव पाटील, बहे सरपंच संतोष दमामे, मसूचीवाडी सरपंच राधिका पाटोळे, युवक कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, आपण या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात २५ कोटी ८ लाखाची विकास कामे केली आहेत. आपल्या मंत्री पदाच्या काळा तच वाळवा-बोरगाव-बहे-कासेगाव हा रस्ता मंजूर केलेला आहे. आपणास जेंव्हा-जेंव्हा संधी मिळाली आहे, त्या – त्यावेळी या परिसराच्या विविध विकासकामांना गती दिली आहे. आपण आपल्या उमेदवारांच्या पाठीशी एकसंघपणे उभा रहा, आपले कोणतेही काम अडणार नाही. शिवाजी वाटेगावकर आणि आम्ही आपल्या सर्व कामांचा निपटारा करू.
संचालक विठ्ठल पाटील म्हणाले, बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात चांगले वातावरण आहे. या मतदारसंघात नक्की बदल होणार आहे. आपण सर्वजण त्यामध्ये मोलाचे योगदान करूया.
देवराज देशमुख म्हणाले, समोरच्या नेत्याने त्यांच्या एखाद्या ओबीसीतील कार्यकर्त्यास संधी का दिली नाही? कोणतीही निवडणूक आली कि, मी आणि माझे कुटुंब हे कसे चालेल?
सौ.कांता वाटेगावकर, रुपाली सपाटे, मनोज पाटील यांनी मतांचा आशिर्वाद देऊन कामाची संधी देण्याचे मतदारांना आवाहन केले. यावेळी सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, माजी संचालिका सुवर्णा पाटील, वैशाली पाटील यांनी राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार व माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी महिलांना दिलेले आरक्षण आणि संधीतून आमच्या महिला भगिनी विविध पदावर प्रभावी काम करीत असल्याची भावना व्यक्त केली. तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बहेचे शिवाजी पाटील, मसूचीवाडीचे बाजीराव नांगरे-पाटील, शंकरराव कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.
हणमंत पाटील, अमरसिंह थोरात, उपसरपंच दिलीप देशमुख, भगवान पाटील, जयदीप पाटील, अमोल गुरव, संभाजी दमामे, रविंद्र बडवे, जालिंदर पाटील, जालिंदर देशमुख, सुधीर रोकडे, दिनकर पाटील,तसेच मसूचीवाडीचे माजी सरपंच सर्जेराव कदम, माजी उपसरपंच संजय कदम, प्रशांत कदम, विश्वास कदम, अमोल कदम, दादासाहेब कदम, भाऊसाहेब कदम, मंगेश पवार, संदीप कदम, राणीताई कदम, प्रकाश माने, सुरेश कदम, संतोष कदम, अमर पाटोळे, संभाजी बल्लाळ तसेच बहे, मसूचीवाडी, बोरगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































