Last Updated on 08 Mar 2022 8:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बदलत्या काळाबरोबरच भारताने तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनवर भर दिला आहे,कृषी क्षेत्र देखील याला अपवाद नाही.नव भारताचा हा महत्त्वपूर्ण पैलू आहे.ज्याच्या सहाय्याने कृषी क्षेत्र भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होईलच , शिवाय प्रतिभावान भारतीय युवक देखील या क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतात. पीक मूल्यांकन, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन,ड्रोनद्वारे कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांची फवारणी,यांसारख्या कामांमध्ये तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकतो.याच संधी लक्षात घेऊन तंत्रज्ञानाबरोबरच शेतीच्या नवीन दिशेने भारत पुढे वाटचाल करत आहे
भारतासारख्या देशात शेती,शेतकऱ्यांचे खूप अधिक महत्त्व आहे.हेच कारण आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि शेतीचे तंत्रज्ञान उन्नत बनवण्याचा संकल्प केला आहे आणि भारत उच्च कृषी विकासाबरोबरच सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे.एवढेच नाही तर कृषी क्षेत्रात महिलांना बचत गटांच्या माध्यमातून सहाय्य पुरवले जात आहे.
कारण कृषिक्षेत्रात लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा गरिबीतून बाहेर काढण्याची आणि त्यांना उत्तम जीवनशैलीकडे घेऊन जाण्याची क्षमता आहे. ‘आपण खाद्य सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षेवर भर देत आहोत.याच दृष्टीने गेल्या सात वर्षांमध्ये आम्ही अनेक जैव-सुरक्षित वाण विकसित केली आहेत.
5 फेब्रुवारी रोजी तेलंगणामध्ये स्थित आयसीआरआयएसएटीच्या 50 व्या वर्धापन दिन समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले शब्द हेच दर्शवतात की भारताचे उद्दिष्ट केवळ खाद्य उत्पादन वाढवणे एवढेच नाही,तर 80 टक्क्यांहून अधिक छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण हे देखील आहे.त्याचबरोबर भारत एफपीओ आणि कृषी मूल्य साखळी स्थापन करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे,जेणेकरून देशातल्या छोट्या शेतकऱ्यांना हजारो एफपीओ मध्ये संघटित करून त्यांना एक जागरूक आणि मोठी बाजारपेठ बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.
साभार । न्यू इंडिया समाचार












































































