Last Updated on 08 Mar 2022 8:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत आता ‘भारताची लक्ष्मी’ कशा प्रकारे कुटुंब आणि समाजाच्या बरोबरच देशाच्या देखील अभिमानाची बाब होत आहे, या समाजाच्या मानसिकतेतील नव्या बदलाबाबत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्धृत केलेल्या स्त्री शक्तीच्या उदाहरणांवरून तुम्ही जाणून घेऊ शकाल.
काश्मीरच्या ‘नमदा’ हस्तकलेला नवसंजीवनी देणाऱ्या – आरिफा जान

आत्तापर्यंत काश्मीरमधील महिला पडद्याआड राहून जीवन जगत होत्या, मात्र आरीफा यांचा चेहरा आता ज्या काश्मीरला दर्शवतो तिथे तरुणी स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासोबतच नवनवीन यशोगाथा रचत आहेत. आरिफा यांची कहाणी श्रीनगरच्या अरुंद गल्ल्यांमधून सुरू होते जिथे त्या एक स्वप्न विणतात. आरिफा जान यांनी 7 वर्षांपूर्वी हस्तकला व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.आणि लगेचच त्यांनी बाजारातून गायब झालेला काश्मीरचा नमदा गालिचा परत बाजारात आणण्याची मोहीम हाती घेतली. नमदा म्हणजे लोकरीपासून बनवलेला गालिचा . काश्मीर विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दोन वर्षांचा हस्तकला व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला मात्र आपल्या कलेला पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी बाजारपेठेचा नवा कल जाणून घेतला. नवीन डिझाईन्स तयार केल्या आणि नवी दिल्ली येथे आयोजित प्रदर्शनात हाताने विणलेला नमदा प्रदर्शित केला. आणि तोच त्यांच्यासाठी कलाटणी देणारा क्षण ठरला. त्यांनतर त्यांनी यासाठी विणकरांना तयार केले आणि अनेक नवीन डिझाईन्स बनवल्या. पूर्वी विणकरांना दिवसभराच्या कामाच्या मोबदल्यात 175 रुपये मिळायचे, पण आरिफाने विणकरांची मजुरी प्रतिदिन 450 रुपये केली.हळूहळू त्यांच्या कामाचे अमेरिकेतही कौतुक होऊ लागले. आज परदेशातही त्यांनी तयार केलेल्या नमदाला मागणी आहे.
वाराणसीच्या गंगा घाटांना नवजीवन देणारी – तेमसुतूला इमसोंग

आजूबाजूला असलेली घाण पाहून प्रशासनावर टीका करणारे लोक आपण अनेकदा पाहिले असतील मात्र पण तेमसुतूला इमसोंग या त्या वेगळ्या लोकांपैकी एक आहेत ज्यांनी घाण दिसल्यावर प्रशासन आणि सरकारवर टीका करण्याऐवजी स्वच्छतेची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली. या कामी त्यांना दर्शिका शाह यांची साथ लाभली. मूळच्या नागालँडच्या असलेल्या तेमसुतूला वाराणसीतील गंगेच्या घाटांची निस्वार्थपणे स्वच्छता करत आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर लोकांना त्यांच्या कामाची माहिती झाली.महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तेमसुतूला यांनी साकार सेवा समिती नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली सुरुवातीच्या काळात त्या दिल्लीतूनच काम करायच्या पण नंतर त्या वाराणसीला गेल्या. 2013 मध्ये, वाराणसी शहरापासून दूर असलेल्या शूल टंकेश्वर घाटाच्या स्वच्छतेचे काम त्यांनी सुरू केले आणि अशा प्रकारे एका मोहिमेचा प्रारंभ झाला.त्यानंतर त्यांनी प्रभू घाटाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेत तोही चकाचक केला.पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी प्रभू घाटाची स्वच्छता केली तेव्हा तिथली अवस्था इतकी बिकट होती की 2 मिनिटे उभे राहणेही कठीण झाले होते. मानवी विष्ठा सर्वत्र पसरली होती, त्यांनी त्या परिस्थितीतच घाटाची स्वच्छता केली.
मात्र दुसऱ्या दिवशी लोकांनी पुन्हा घाण पसरवली. त्यांनी लोकांना घाण करण्यापासून थांबवले तर लोक त्यांना धमकावायचे, म्हणायचे – तुम्ही कोण थांबवणारे? मात्र तेमसुतूला आणि त्याच्या टीमने हार मानली नाही. तेमसुतूला यांच्या कार्याने प्रभावित होऊन, जुलै 2015 मध्ये, पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात आमंत्रितही केले होते.
ओडिशात जनजागृतीची नवी ओळख – मतिल्दा कुल्लू

गेल्या वर्षी फोर्ब्स इंडियाने सामर्थ्यशाली महिलांची यादी जाहीर केली यात समाविष्ट मतिल्दा कुल्लू यांच्या नावाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले.मतिल्दा या ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या क्षेत्रात ‘आशा दीदी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतिल्दा या 15 वर्षांपूर्वी आशा कार्यकर्ता बनल्या.आजारी पडल्यावर ग्रामस्थ डॉक्टरांकडे जाण्याऐवजी ‘काळी जादू करणाऱ्या तंत्रिका’कडे जात असल्याचे त्यांनी पाहिले.या लोकांना त्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला द्यायच्या तर गावातील लोक त्यांची चेष्टा करायचे.मात्र त्यांनी हार मानली नाही. कोणताही आजार बरा होण्यासाठी आवश्यक उपचार आणि औषधांबाबत लोकांमध्ये जागृती करून ग्रामस्थांची मानसिकता बदलण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अखेर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.ग्रामस्थ आता तांत्रिकाकडे जाण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेतात.कोविड -19 ने भारतात पाय पसरल्यावर मतिल्दा यांचे काम वाढले.याच दरम्यान त्यांनी बडागाव तालुक्यातील गरगडबहल गावातील 964 लोकांच्या देखभालीसाठी आपले जीवन समर्पित केले.या दरम्यान त्यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होतो.घरातील कामे उरकून आणि 4 लोकांसाठी स्वयंपाक तयार करून , गुरांना चारा देऊन मतिल्दा सायकलवरून निघतात. घरोघरी जाऊन लोकांकडून आरोग्यविषयक माहिती संकलित करतात. यासोबतच त्या महिला ग्रामस्थांना नवजात बालकांचे आणि किशोरवयीन मुलांचे लसीकरण, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीची तयारी, गर्भवती महिलांना पौष्टिक आहार इत्यादींबाबबत सल्ला देतात.
मोहना, भावना, अवनी यांनी दाखवून दिले देशाच्या मुली कोणापेक्षाही कमी नाहीत

भारतीय हवाई दलात महिला दीर्घकाळापासून कार्यरत आहेत, मात्र त्यांना नेहमीच लढाऊ भूमिकांपासून दूर ठेवण्यात आले आहे.पण जून 2016 मध्ये नवा इतिहास लिहिला गेला, जेव्हा फ्लाइंग ऑफिसर मोहना सिंग, फ्लाइंग ऑफिसर भावना कंठ आणि फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी संयुक्त दीक्षांत संचलनामध्ये सहभागी होऊन महिला लढाऊ वैमानिक बनण्याचा गौरव प्राप्त केला. सशस्त्र दलात महिलांना महत्त्वाची भूमिका देण्याच्या या सुरुवातीमुळे देशाचा केवळ गौरवच वाढवला नाही तर लाखो मुलींना नवा मार्गही दाखवला.2018 मध्ये, एकटीने मिग-21 बायसन उड्डाण करणारी फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी देशातील पहिली महिला लढाऊ वैमानिक ठरली. मूळची राजस्थानची असलेल्या मोहना सिंहचे वडील आणि आजोबांनीही देशाच्या संरक्षणासाठी आपली सेवा बजावली, यातूनच मोहनाला प्रेरणा मिळाली. तर मध्य प्रदेशातील सतना येथील अवनीने फ्लाइंग क्लबमध्ये विमान उड्डाण केल्यानंतर हवाई दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या भावना कंठला स्वतःच्या इच्छेनेच आकाशात झेप घायची होती. या तिघींच्या यशानंतर संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलातील महिला लढाऊ वैमानिकांच्या प्रायोगिक तत्त्वावरील योजनेचे कायमस्वरूपी योजनेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.मुलींच्या प्रवेशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलले, त्यांनी महिलांसाठी आतापर्यंत बंद राहिलेल्या सैनिकी शाळांचे दरवाजे या वर्षीपासूनच उघडण्याची घोषणा करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महिलांच्या प्रवेशाला मान्यता देऊन नव भारताच्या केंद्रस्थानी स्त्रीशक्तीचा संकल्प सुरू झाला आहे.
प्रत्येक निराधार मुलासाठी वात्सल्यमूर्ती – सिंधुताई

आपल्या देशात आईला देव मानले जाते. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सिंधू ताई रस्त्यावर बेवारस हिंडणाऱ्या प्रत्येक मुलाची आई झाल्या. त्यांना पद्मश्रीसह 750 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तेव्हा त्यांना संपूर्ण देशात ओळखही मिळाली पण हे यश सोपे नव्हते.यामागे एक प्रदीर्घ संघर्ष होता, ज्याची सुरुवात महाराष्ट्रातील वर्धा येथे त्यांच्या जन्मापासून झाली आणि जन्मानंतर सिंधुताईंचे नाव चिंधी ठेवण्यात आले.चिंधी म्हणजे कपड्याचे फाडलेले तुकडे ज्याला काही किंमत नसते. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबी होती, त्यामुळे ना चांगले संगोपन झाले ना शिक्षण झाले. वयाच्या 10 व्या वर्षी या लहानग्या जीवाचे लग्न 30 वर्षीय श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत करून देण्यात आले. वयाच्या 20 व्या वर्षी चिंधी 3 मुलांची आई बनली होती.चौथे अपत्य पोटात असताना , असत्याच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले.चिंधीच्या घरच्या लोकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली.त्यांनी एका मुलीला जन्म दिला.एकटीने मुलीला जन्म देणे सोपे नव्हते. दगडाने ठेचून ठेचून त्यांनी नाळ कापली. यानंतर सिंधूने आपल्या मुलीसाठी रेल्वे स्थानकावर भीकसुद्धा मागितली. मनात मरण्याचा विचारही आला.हाच विचार करत चिंधीने त्या दिवशी भरपूर अन्न गोळा केले आणि ती ते खाऊ लागली. तिने हे तिला उपाशी मरायचे नव्हते म्हणून केले.उरलेले अन्न तिने सोबत बांधून घेतले आणि आपल्या मुलीला सोबत घेऊन रेल्वे रुळांच्या दिशेने जाऊ लागली. वाटेत एक भुकेलेला माणूस दिसल्यावर त्याला उरलेले अन्न दिले. तेव्हापासून रेलवे स्थानकावर किंवा आजूबाजूला बेवारस सापडलेल्या प्रत्येक मुलाच्या सिंधुताई आई झाल्या. मुले मोठी झाल्यावर सिंधुताई भाषण करू लागल्या जेणेकरून देणग्या मिळाव्यात.या वर्षी 4 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विट करून सांगितले की, “डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी समाजासाठी केलेल्या उदात्त सेवेसाठी त्या सदैव स्मरणात राहतील..”
त्रिवार तलाक विरोधात लाखो महिलांचा आवाज – सायरा बानो

उत्तराखंडमधील काशीपूर येथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची कन्या असलेल्या सायरा बानो यांचा विवाह 11 एप्रिल 2002 रोजी प्रयागराजच्या जीटीबी नगर भागातील रहिवासी असलेल्या रिजवान यांच्याशी झाला होता.इतर अनेक मुलींप्रमाणेच समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर केलेल्या सायरा, सुखी आयुष्याची हजारो स्वप्ने उराशी बाळगून माहेरच्या घरातून सासरी आल्या.मात्र काही दिवसांनी प्रॉपर्टी डीलर पती आणि सासरच्या इतर मंडळींनी त्यांचा छळ सुरू केला. दोन मुले असूनही सायरा यांना मारहाण केली जायची.त्यांना टोमणे मारून घरातून हाकलून देण्याची धमकी दिली जायची.ऑक्टोबर 2015 मध्ये, जेव्हा सायरा काही दिवसांसाठी त्यांच्या माहेरी आली तेव्हा त्यांच्या पतीने एका कागदावर तीनदा तलाक लिहून त्यांना कायमचे .सोडल्याचे घोषित केले. सायरा यांच्याप्रमाणेच लाखो महिलांना हा त्रास सहन करावा लागत होता आणि येत्या काही वर्षांत आणखी कोट्यवधी महिलांनाही याचा सामना करावा लागणार आहे, त्यामुळे सायरा यांनी त्रिवार तलाक विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, तर 1985 मध्ये शाह बानो प्रकरणातील तत्कालीन सरकारची चूक ताबडतोब अध्यादेश आणून सुधारण्यात आली.यानंतर, मोठ्या विरोधानंतर जुलै-ऑगस्टमध्ये हा कायदा संसदेने मंजूर करून कोट्यवधी मुस्लिम महिलांना हक्क मिळवून दिला.
त्रिवार तलाक संपुष्टात
राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर 2019 मध्ये मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायदा लागू झाला,मात्र या कायद्याची अंमलबजावणी 19 सप्टेंबर 2018 पासून पूर्वलक्षी प्रभावने करण्यात आली.
नितिका गुप्ता – इन्स्टाग्रामवरील विपणन ते स्टार्टअप पर्यंतचा प्रवास

जर तुम्ही धैर्यवान असाल आणि तळमळीने काहीतरी करण्याची जिद्द तुमच्यात असेल तर कोणताही मार्ग अवघड नसतो. जम्मू-काश्मीरच्या नितिका गुप्ता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.एआईएफटी मधून पदवी प्राप्त केल्यानंतर, उत्पादन व्यवस्थापक म्हणून एका कंपनीत काम करत असताना, नितिका यांनी प्रत्येक राज्याची पारंपरिक कला अतिशय जवळून पाहिली.लहानपणापासून त्यांचा क्रिएटीव्हीटी म्हणजेच सर्जनशीलटेकडे ओढा होता. पण नोकरीच्या दैनंदिन नित्यक्रमात त्यांची सर्जनशीलता कुठेतरी दबून जात होती. कोविडमुळे देशात कडक लॉकडाऊन लागू झाला तेव्हा घरातून काम करत असताना, नितिका यांच्या मनात एक नवी सुरुवात करण्याचा विचार आला. लॉकडाऊनमध्ये बहुतेक हस्तकला कारागीर घरी बसले होते, नितिका यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर पाइन कोन नावाने एक पृष्ठ तयार करून या कारागिरांच्या उत्पादनांचे विपणन सुरू केले.थोडा वेळ लागला मात्र हळूहळू केलेली ही सुरुवात,दिल्लीत स्वतःची कंपनी आणि कार्यालय सुरु करण्यापर्यंत पोहोचली. त्यांनी 1 वर्षातच 10 लाख रुपयांच्या उलाढालीचा आकडा ओलांडला आहे.सध्या अनेक राज्यातील 200 हून अधिक कारागीर त्यांच्याशी जोडले गेले आहेत. महिलांचा यात समावेश आहे, यापूर्वी या महिलांचे जगणेही मुश्किल होते मात्र आता या महिला चांगले उत्पन्न मिळवत आहेत. नितिका अनेक राज्यांतील पारंपरिक कलांच्या हस्तकला उत्पादनांची विक्री करतात.
सगळ्यांना वाटायचे स्वयंपाकपाणी करावे,मात्र तिने हाती घेतली हॉकी स्टीक-वंदना कटरिया

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला कमी महत्त्व दिले जात असताना, वंदना कटरियाने एका पाठोपाठ तीन गोल करत देशाला आनंद व्यक्त करण्याची संधी दिली. ती भारताकडून हॅट्रिक करणारी ऑलिम्पिक इतिहासातील पहिली महिला ठरली. हॉकीपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करणे वंदना कटरियासाठी इतके सोपे नव्हते.ती उत्तराखंडच्या रोशनाबाद गावात लहानाची मोठी झाली.तिने आपली स्वप्ने पूर्ण करावीत हे तिच्या शेजाऱ्यांही नको होते. तिने घरातील कामात मदत करावी असे तिच्या आजीलाही वाटत होते.पण कुस्तीपटू राहिलेले तिचे वडील नाहर सिंह कटारिया यांनी पुढे येऊन वंदनाला पाठिंबा दिला आणि तिला या खेळात व्यावसायिकरित्या पुढे जाण्यास मदत केली.सुरुवातीच्या काळात प्रशिक्षणासाठी योग्य उपकरणे नव्हती.तेव्हा कौशल्य वाढवण्यासाठी ती झाडांच्या फांद्या घेऊन सराव करत असे. जेव्हा तिचे पहिले प्रशिक्षक प्रदीप चिन्योती यांनी तिला शालेय स्पर्धेत पाहिले आणि तिला पहिल्यांदा भारताकडून खेळण्यास मदत केली.भारतीय संघात फॉरवर्ड खेळणारी वदना संघाची कर्णधारही राहिली आहे.देशासाठी अनेक पदके जिंकणारी वंदना केंद्र सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) चा एक भाग असण्यासह ती उत्तराखंडमधील बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेची सदिच्छा दूत देखील आहे.
पलंगाखाली मशरूम पिकवून मशरूम लेडी बनली बीना देवी

शेतीप्रधान भारतात कृषी हे असे क्षेत्र आहे जिथे महिलांची संख्या खूप कमी आहे . अशा या कृषी क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मुंगेरच्या बिना देवी आहेत, ज्यांनी आपल्या पलंगाखाली मशरूमची शेती केली आणि आज संपूर्ण देशात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता . बीना देवी यांच्याकडे मशरूमची शेती करण्यासाठी ना जमीन होती ना शेत. मात्र त्या हिंमत हरल्या नाहीत आणि त्यांनी आपली बुद्धी वापरून त्या ज्या पलंगावर झोपायच्या त्या पलंगाच्या खाली एक किलो बियाणे मागवून त्याची शेती करायला सुरुवात केली . मशरूमची शेती करण्यासाठी सर्वप्रथम बिना देवी यांनी आपल्या पलंगाला चारी बाजूने साडी गुंडाळली. मात्र त्यांची ही पद्धत जेव्हा लोकांपर्यंत पोहोचली, तेव्हा लगेच कृषी विद्यापीठाचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाची छायाचित्रे आणि व्हिडिओ बाहेरच्या जगात व्हायरल झाले आणि जे विद्यापीठांमध्ये दाखवण्यात आले. बीना देवी यांनी आपल्या अथक परिश्रमातून मुगेरच्या पाच तालुक्यातल्या एकशे पाच गावांमध्ये मशरूमची शेती करण्यासाठी वेगळी जागा दिली आहे , ज्यामुळे 1500 कुटुंबांच्या जीवनमानात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे . मशरूमच्या शेतीबरोबरच बीना देवी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, कंपोस्ट उत्पादन आणि सेंद्रिय कीटकनाशक तयार करण्याचे प्रशिक्षण देखील देत आहेत . बिना देवी यांच्या उत्साहामुळे आज ग्रामीण महिलांमध्ये दूध आणि बकरी पालन प्रति खास रुची निर्माण झालेली पहायला मिळत आहे. बीना देवी यांची गाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँड्लच्या माध्यमातून सामायिक केली होती.
बसंती देवी – ज्यांनी झाडांना वाचवणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले

उत्तराखंडची कोसी नदी हजारो लोकांसाठी उपजीविका आणि जगण्याचे एक माध्यम आहे . मात्र काळाबरोबरच वाढत्या गरजांमुळे जेव्हा पाणी कमी व्हायला लागले, तेव्हा त्याच्या किनाऱ्यालगतच्या जंगलांच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका महिलेला हे सगळं पहावले नाही आणि तिने नदीला नवजीवन देण्याबरोबरच पर्यावरणाप्रति लोकांना जागरूक करण्याचा निश्चय केला. कौसानीच्या लक्ष्मी आश्रम इथे राहणाऱ्या या महिलेला लोक बसंती ताई नावाने ओळखायचे . मात्र वयाच्या बाराव्या वर्षी पतीला गमावणाऱ्या बसंती ताईंनी जीवनात कधीही हार मानली नाही . पतीच्या मृत्यूनंतर लक्ष्मी आश्रम हे त्यांचे घर बनले. इथेच राहून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले, नंतर संपूर्ण जिल्ह्यात बालवाडी आश्रम उघडले. इथे त्या स्वतः शिकवायच्या. कधी काळी बालविवाहाच्या वेदना सहन केलेल्या बसंती ताई घरोघरी जाऊन लोकांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगायच्या. 2003 मध्ये एका वृत्तपत्रात बातमी छापली होती की जंगलांमधील वृक्ष छाटणीमुळे पुढल्या दहा वर्षात कोसी नदी कोरडी होईल . तेव्हा बसंती देवी यांनी नदी वाचवण्याचा विडा उचलला. चिपको आंदोलनाच्या भूमीवरून आलेल्या बसंती देवी जंगला जंगलात भटकल्या आणि लोकांना समजावले की वृक्षतोड करू नका नाहीतर नदी कोरडी होईल . वृत्तपत्र कात्रणे घेऊन वृक्षतोड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या दाखवायच्या , हळूहळू हे चित्र बदलायला लागले. 2016 मध्ये बसंती देवी यांना महिलांसाठीचा देशातला सर्वोच्च पुरस्कार नारी शक्ति पुरस्काराने गौरवण्यात आले होते . 2022 साठी बसंती देवी यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे.
आसाममध्ये सशक्तीकरणाच्या प्रतीक बनल्या आहेत लखीमी बरुआ

अहोम राजांची शेवटची राजधानी म्हणून जोरहाट प्रसिद्ध आहे. तेच जोरहाट जे तिथल्या चहाच्या मळ्यांसाठी देखील ओळखले जाते. 1949 मध्ये तिथे लखिमी बरुआ यांचा जन्म झाला . मात्र त्यांना जन्म देणारी आई देवाघरी गेली. घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती , मात्र वडिलांनी कठोर परिश्रम करून त्यांचे संगोपन केले.लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या. मात्र ईश्वराच्या मनात दुसरं काहीतरी होते. 1969 मध्ये पित्याचे छत्र हरपले, तेव्हा त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. 1973 मध्ये लग्न झालं तेव्हा त्यांच्या पतीने पुन्हा एकदा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. लखीमी यांनी 1980 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखा व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्या. इथून सुरुवात झाली लखीमी यांच्या त्या नवीन आयुष्याची, ज्यासाठी आज आसामच नाही तर संपूर्ण देश त्यांना ओळखतो. नोकरी करताना त्यांनी पाहिले की गावांमधील गरीब, अशिक्षित महिला, चहाच्या मळ्यात मजुरी करणाऱ्या महिला कित्येक तास कर्ज घेण्यासाठी रांगेत उभ्या राहत होत्या. काउंटर पर्यंत पोहचुनही सर्व कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागायचे. लाचार महिला रडायच्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू लखिमी यांच्या मनावर ओघळायचे. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी 1983 मध्ये जोरहाट मध्ये एक महिला समिती स्थापन केली आणि 1990 मध्ये कनकलता महिला सहकारी बँकेची सुरुवात केली . नोंदणीसाठी त्यांना आठ वर्षे संघर्ष करावा लागला . दोन दशकांहून अधिक काळ संचलित या बँकेच्या आता चार शाखा आहेत, ज्यामध्ये आता सुमारे 45 हजार खातेधारक आहेत. बँकेमध्ये रोजगार केवळ महिलांनाच मिळतो . भारत सरकारने लखीमी बरुआ यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
मदुराईहून दिल्ली पर्यंत सामानाचा पुरवठा करत आहे अरुलमोळी

अरुलमोळी सरवणन अशा महिलांसाठी आज एक उदाहरण बनून समोर आल्या आहेत , ज्यांची स्वप्ने घराची देखभाल आणि मुलांचे संगोपन करता करता धुळीला मिळतात. मात्र तामिळनाडूच्या मदुराई येथे राहणाऱ्या अरुलमोळी यांनी समस्या म्हणून नाही तर एक आव्हान म्हणून याकडे पाहिले. दोन लहान मुलांमुळे त्या बाहेर काम करण्यासाठी जाऊ शकत नव्हत्या. तेव्हा त्यांनी असा विचार केला की एखादा असा उद्योग करावा ज्यात घरूनच काम करता येईल. स्टेशनरीच्या कामापासून सुरुवात केली आणि सरकारी ई-मार्केट प्लेस(Gem) पोर्टल वर स्वतःची नोंदणी केली. मोठी ऑर्डर मिळाली, मात्र समोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. मात्र प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमुळे ही समस्या देखील दूर झाली. अरुलमोळी सांगतात , “केवळ आधार कार्ड आणि एका फोटोवर कर्ज. एवढ्या सहजपणे कर्ज मिळेल, असे तुम्ही यापूर्वी कधी ऐकले होते का? आता त्या मदुराई इथूनच सामान पुरवत आहेत. पंतप्रधान कार्यालयापासून संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयापर्यंत जीईएम पोर्टलच्या माध्यमातून त्यांचे सामान पोहचत आहे, अरुलमोळी यांनी या प्रयत्नात चार जणांना रोजगार देखील दिला आहे. आता त्या लवकरच एका मोठ्या कंपनीच्या माध्यमातून 40 लोकांना रोजगार देणार आहेत.
भारत भाग्य लक्ष्मी | पद्म पुरस्कारांच्या सूचीमध्ये 34 महिलांचा समावेश
‘‘2015 पासून ते आत्तापर्यंत 185 महिलांना,त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्याबद्दल पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.यावर्षीही 34 पद्म पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणा-या महिलांना मिळाले आहेत.हा एक विक्रमच आहे. आत्तापर्यंत कधीच इतक्या मोठ्या संख्येने महिलांना पद्म पुरस्कार मिळालेले नाहीत.नवीन भारतामध्ये नारीशक्तीला आज महत्वाचे स्थान मिळाले आहे. देशाच्या शीर्ष सन्मानामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. 2022 मध्ये पद्म पुरस्कारांच्या सूचीमध्ये 34 महिलांचा समावेश आहे.
पूर्व विदेश मंत्री सुषमा स्वराज,ओलंपियन बैडमिंटन खिलाड़ी पीवी सिंधु,एक्ट्रेस कंगना रनोट,टीवी सीरियल निर्माता एकता कपूर,डॉ. विद्या विंदू सिंह,रमीलाबेन गामित,अवनी लखेरा,गुरमीत बावा,बसंती देवी,बडापलिन वार,एल. बिनो देवी,दुर्गाबाई व्याम,ललिता वकील,अजीता श्रीवास्तव,तातियाना एल.,पद्मजा रेड्डी,वंदना कटारिया,सौकर जानकी,मुक्तामणी देवी,शकुंतला चौधरी,सुलोचना चव्हाण,माधुरी बर्थवाल,नजमा अख्तर,प्रतिभा राय,श्याममणी देवी,संघमित्रा,कमलिनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना,प्रभा अत्रे,मधूर जाफरी,आर मुथुकन्नमल,आचार्य चंदनाजी,के.वी. राबिया,सोसम्मा लिप्पे,डॉ. लता देसाई












































































