सांगली ।
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,राजारामनगर डिप्लोमा सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने व रामदूत फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने शनिवारी बहे रामलिंग बेटावर स्वच्छता मोहीम पार पडली.
तंत्र शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि कार्य याबद्दल चे महत्त्व समजावे यासाठी दरवर्षी महाविद्यालयामार्फत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. सदर उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि रामदूत फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी रामलिंग बेट-बहे येथे स्वच्छता मोहीम राबवली.
या मोहिमेत सुरुवातीला रामदूत फाऊंडेशनचे सदस्य रोहित तोरसकर यांनी रामदूत फाऊंडेशनच्या कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.सदर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागातील एकूण ४० विद्यार्थी ०७ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि रामदूत फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रा. महेश यादव, हेमंत पाटील, प्रा. प्रवीण देसाई,प्रा. अक्षय कुलकर्णी,प्रा. स्वाती पाटील,प्रा. अंकिता जाधव,प्रा. सरिता साळुंखे,प्रा. सचिन अवघडे यांनी या स्वच्छता मोहिमेचे संयोजन केले.
महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.सौ.सुषमा कुलकर्णी,डिप्लोमा डीन डॉ. एच. एस. जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.