Last Updated on 01 Mar 2022 3:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
माजी जेष्ठ मंत्री व चौंडी विकास योजनेचे शिल्पकार आण्णासाहेब डांगे यांच्या सुनबाई व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ इस्लामपूरच्या अध्यक्षा सौ.सविता विश्वनाथ डांगे यांनी महाशिवरात्रीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगांवी चौंडी (ता.जामखेड,जि.अहमदनगर) येथे ३०० शिवलिंग पिंडी स्वतः तयार करून चौंडी येथे मनोभावे पूजन करून रूद्र अभिषेक मुख्य शिवपिंडीवर केला.
गेल्या वर्षापासुन सौ.सविता डांगे या महाशिवरात्री निमित्त हा भावनिक व मनोभावे उपक्रम राबवित आहेत.
माजी जेष्ठ मंत्री,धनगर समाजाचे राज्याचे नेते आण्णासाहेब डांगे यांनी या चौंडी परिसरात अनेक वर्षे मुक्कामी राहून चौंडी विकासाचा कायापालट केला आहे.याठिकाणी असणारे अहिलेश्वर मंदीर,चौंडेश्वरी,सिनेश्वर महादेव मंदीर,मारूती मंदीर यांचा जिर्णोद्वार तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा भव्य किर्ती स्तंभ उभारला आहे.लोकोपयोगी एक भव्य हॉल उभारला आहे.
नाविन्यपूर्ण अशी शिल्प सृष्टी,तसेच या ठिकाणी असणाऱ्या सिना नदीवर मोठा येणे – जाणेसाठी पुल बांधला आहे.यासह अनेक विकासात्मक कामे शासनाच्या निरनिराळ्या योजना राबवून चौंडी या गावाचा कायापालट केला आहे.यामुळे चौंडी एक पर्यटन स्थळ निर्माण झालेले पहावयास मिळते.
सौ.सविता डांगे यांनी चौंडी येथील शिवपिंडीवरती पहाटे रूद्र अभिषेक करून विधिवत पुजा केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शिवपिंडी वरती असणारी श्रध्दा,शक्ती सर्वांच्या पुढे सतत जागृत रहावी या भावनेतुनच हा उपक्रम सुरू केला आहे.या त्यांच्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.महाशिवरात्री निमित्त ३०० शिवलिंग तयार करण्यासाठी सुशांत सिध्द,विशाल पाटील,दत्तात्रय शेलार,सुनिल टिळे,जयराज डांगे यांनी सहकार्य केले आहे.










































































