Last Updated on 28 Feb 2022 7:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हेमंत नगराळे यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
मुंबई ।
राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या या पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील.
याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. आता नगराळे हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील.












































































