नवी दिल्ली ।
रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे.सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढता तणाव संपूर्ण जगासाठी चिंतेचे कारण ठरला आहे.महागाईचा मोठा फटका देशवासीयांना बसणार आहे. प्रचंड वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होण्याची शक्यता आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि युद्धाची शक्यता यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु झाल्यास कच्चे तेल आणखी महाग होऊ शकते.
सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढता तणाव संपूर्ण जगासाठी चिंतेचे कारण ठरला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सर्व घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही होताना दिसत आहे.युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे.आज (गुरुवारी) कच्च्या तेलाच्या किंमती 101.09 डॉलर प्रति बॅरलच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा भाव 101.09 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाचा विक्रमी भाव ठरला आहे.
रशिया-युक्रेन वाद शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा फटका कच्च्या तेलाच्या किंमतीला बसला आहे.रॉयटर्स वृत्तसंस्थेने क्रूड तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविला होता.देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा देखील भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कच्च्या तेलाच्या किमती पेटल्या आहेत. 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर होती.जे आता प्रति बॅरल 100 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत आहे.म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.