Last Updated on 21 Feb 2022 11:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य सरकारचा अनोखा उपक्रम!
मुंबई ।
राज्यातील दिव्यांगांना एक अतिशय आनंदाची बातमी.त्यांनी आता आपल्या नावाची नोंदणी सरकार दरबारी करताच त्यांना अनेक सुविधा या मोफत मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले आहे.दिव्यांग व्यक्तींनी https://www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणार आहे.
हे पोर्टल म्हणजे शासनाचा मंच (प्लॅटफॉर्म) असून त्यावर नोंदणीद्वारे राज्यातील दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाद्वारे व्याख्या केलेल्या दिव्यांग व्यक्तींना मदत तसेच सहाय्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करता येणार आहे. या पोर्टलवर राज्यातील दिव्यांग नागरिक सुलभतेने आपली नोंदणी करु शकतात.
महाशरद पोर्टल हे दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणारे देणगीदार,अशासकीय संघटना,सामाजिक संस्था, कंपन्या, समाजसेवक या सर्वांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. या सर्वांना एकाच व्यासपीठाखाली आणणे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे या बाबी या पोर्टलमुळे शक्य होणार आहेत,महाशरद पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव व साहित्य उपलब्ध होणार आहे.
दृष्टी आणि ध्येय
महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.
१) संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.
२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
३) विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे.
४) दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.
महाशरद पोर्टलमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया अशी असेल
सर्वात अगोदर इच्छूक व्यक्तीला सामाजिक न्याय व विशेष साहायता विभाग महा शरद पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्या समोर स्क्रिनवर संकेतस्थळाचे होमपेज सुरू होईल. तुम्हाला या होमपेजमध्ये दिव्यांगांसाठी नोंदणी (Register as Divyang) या लिंकवर क्लिक करावी लागेल.
क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रिनवर नोंदणीसाठीचा अर्ज (फॉर्म) खुला होईल.
तुम्ही या अर्जात तुमचे नाव, लिंग, जन्मदिनांक, राज्य, जिल्हा, तहसील, गाव किंवा शहराचे नाव, पिनकोड, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक अशा स्वरुपात माहिती नमूद करावी लागेल.
सर्व माहिती नमूद केल्यानंतर तुम्ही नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी भरून त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या अपंगत्वाचे स्वरुप काय आहे, हे कन्फर्म करण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एकासमोर टीक करावे लागेल.
तिथेच तुमचा युडीआईडी क्रमांक भरावा. आणि 150 केबी साईजमध्ये तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करावे.
त्यानंतर खाते कोणामार्फत सुरू केले (Account Created By) यासंबंधी पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करावी.
शेवटी नोंदणी करा (Registered) या बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्णपणे भरून होईल.
महाशरद पोर्टल महत्वाची कागदपत्रे आणि पात्रता
- ️ अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- ️ अर्जदार अपंग असावा.️
- आधार कार्ड
- ️ अपंगत्व प्रमाणपत्र
- ️ रहिवासी प्रमाणपत्र
- ️ जन्माचा दाखला
- ️ पासपोर्ट आकाराचा फोटो
- ️ मोबाईल नंबर
महा शरद पोर्टल देणगीदार नोंदणी खालीलप्रमाणे :
सर्वप्रथम तुम्हाला महा शरद पोर्टल च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, महा शरद पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
️ तुम्ही महा शरद पोर्टलवर जाताच, त्याचे Home Page तुमच्या समोर उघडेल, तुम्हाला होम पेजवर मेनूबारमध्ये देणगीदार चा पर्याय दिसेल, जो तुम्ही खाली पाहू शकता…
️ देणगीदार या पर्यायावर क्लिक केल्यावर, खाली दर्शविल्याप्रमाणे, देणगीदार नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
️ तुम्ही प्रोफाइल माहिती आणि देणगीची माहिती टाकून दोन टप्प्यांत हा फॉर्म नोंदणी करू शकता.
️ प्रोफाइल माहिती : या पर्यायामध्ये तुम्ही तुमचे नाव, आडनाव, पत्ता, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, पासवर्ड इ.
️ देणगी माहिती : सर्व प्रथम, तुम्ही ज्या अपंग व्यक्तीला मदत करू इच्छिता त्या व्यक्तीची निवड कराल आणि देणगीच्या वेळेत, तुम्ही रुपये निवडाल आणि तुम्हाला देणगी द्यायची असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि नोंदणी करा या बटणावर क्लिक करा.
महाशरद पोर्टल-येथे क्लिक करा









































































