दि. २० फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता रोजी ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते लिगचे उदघाटन
राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जयंत कबड्डी प्रिमियर लिग’ची तयारी झाली पूर्ण
निनाईनगर (इस्लामपूर) येथील जयंत स्पोर्ट्सच्या मैदानावर चार दिवस घुमणार ‘खेल कबड्डी’चा नारा
राष्ट्रीय कबड्डीपटू,माजी नगरसेवक खंडेराव जाधव (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी ही लिग
सांगली ।
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जयंत कबड्डी प्रिमियर लिग’ची तयारी पूर्ण झाली असून निनाईनगर (इस्लामपूर) येथील जयंत स्पोर्ट्सच्या मैदानावर चार दिवस ‘खेल कबड्डी’चा नारा घुमणार आहे. आज ( दि.२० फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीत लिगचे उदघाटन होणार आहे. राष्ट्रीय कबड्डीपटू, माजी नगरसेवक खंडेराव जाधव (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी ही लिग संपन्न होत आहे.
सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या लिगचे थेट प्रक्षेपण के न्यूज टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून केले जाणार आहे. प्रतिराज युथ फौंडेशन आणि कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने ही लिग होत आहे. १३ मीटर बाय १० मीटरचे कबड्डी मैदान तयार केले मैदानाच्या मध्यभागी टांगती एलईडी व्यवस्था केली आहे. ८० बाय २५ चे भव्य व्यासपीठ मैदानाच्या पूर्व बाजूला उभा केले आहे. मैदानाच्या पश्चिम तसेच उत्तर- दक्षिण बाजूला गॅलरी उभा केली केल्या आहेत. महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. जयंत स्पोर्ट्सच्या समोरच्या मैदानात चार चाकी गाड्यांचे तर मैदानाच्या पश्चिम बाजूच्या रस्त्यावर दोन चाकी गाड्यांचे पार्किंग केले जाणार आहे.किशोर गावडे (मुंबई), प्रसाद देशपांडे (राजारामनगर) हे सामन्यांचे समालोचन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने,राष्ट्रीय कबड्डीपटू विकास पाटील (कामेरी) या दोघांची तांत्रिक समिती स्थापन केलेली आहे.
वाळवा व शिराळा तालुक्यातील ७० किलो गटाखालील ८ संघ या लीगमध्ये खेळणार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचा राजारामबापू ईगल्स कासेगाव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील स्व.जगदीश पाटील (आप्पा) रायडर्स कामेरी, आदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील यांचा आदिती पँथर्स ओझर्डे,रविंद्र पाटील (वाळवा) यांचा राजेंद्र पाटील युवा मंच फायटर्स,अतुल लाहिगडे (कासेगाव) यांचा शरद लाहिगडे हरिकन्स,सागर पाटील,संजय जाधव (जुनेखेड) यांचा स्फुर्ती रॉयल्स, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा जय हनुमान सहकारी नागरी पतसंस्था आणि शिराळ्याचे युवा नेते पृथ्वी नाईक यांचा शिराळा कोब्रा या संघांच्यामध्ये हे घुमसान होणार आहे.
जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, कबड्डी संघटक विजय देसाई (सोन्या बापू), उमेश रासनकर,माजी नगरसेवक सदानंद पाटील,सचिन कोळी,शिवाजी पाटील,अजय थोरात,किरण पाटील,अंकुश जाधव, अभिजित पाटील,संदीप कोळी यांच्यासह स्पोर्ट्सचे खेळाडू व कार्यकर्ते लिग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.