Last Updated on 07 Jan 2022 10:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
राज्यात आज तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.शुक्रवारी रुग्ण संख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.मुंबईमध्ये आज 20 हजार 971 नवीन रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रभरात 14 हजार 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात आज ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला नवीन रुग्ण आढळलेला नाही.राज्यात आतापर्यंत 876 ओमिक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे.त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.07 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 87 हजार 505 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात आतापर्यंत 68 लाख 34 हजार 222 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी 65 लाख 47 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 1 लाख 41 हजार 614 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या 7 लाख 42 हजार 684 जण होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 463 जण कोविड सेंटरमध्ये आहेत.

New Cases – 40,925
Recoveries – 14,256
Deaths – 20
Active Cases – 1,41,492
Total Cases till date – 68,34,222
Total Recoveries till date -65,47,410
Total Deaths till date – 1,41,614
Tests till date – 7,01,46,329









































































