मुंबई |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक त्या त्या विभागीय मंडळांच्या वतीने जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी झाल्याने यंदा होणाऱ्या सकाळच्या सत्रातील लेखी परीक्षा अर्धातास आधी होणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखण सराव कमी झाल्यामुळे ८०,९० आणि १०० मार्काच्या परीक्षांना अर्धातास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ५०,६० आणि ७० मार्काच्या परीक्षांना १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. यंदाची परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने आणि ७५ टक्के अभ्यासक्रमावरच होणार आहे.
SSC March-April 2022 Exam. time table
HSC March-April 2022 Exam. time table (HSC VOCATIONAL)
HSC March-April 2022 Exam. time table (General & Bifocal)
SSC Exam March-2022 Divyang candidates work education subject time table.