नवी दिल्ली ।
केंद्रीय विद्यापीठांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत शैक्षणिक सत्र 2022-2023 पासून होणार आहे.पीएचडी च्या प्रवेशासाठी जेथे शक्य असेल तेथे NET स्कोअर वापरला जाईल,असे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) ने म्हटले आहे.
त्यानुसार,सर्व केंद्रीय विद्यापीठांना शैक्षणिक सत्र 2022-2023 पासून सामायिक प्रवेश परीक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या चाचण्या किमान 13 भाषांमध्ये घेतल्या जातील ज्यामध्ये NTA आधीच JEE आणि NEET परीक्षा घेत आहे, असे UGC ने म्हटले आहे.विद्यापीठांच्या कुलगुरूंना याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
आयोगाने म्हटले आहे की,इच्छुक राज्य/खाजगी विद्यापीठे/विद्यापीठ समजल्या जाणार्या द्वारे देखील सामाईक प्रवेश परीक्षा स्वीकारली जाऊ शकते.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP), 2020 ने NTA मार्फत सर्व विद्यापीठांसाठी CET प्रस्तावित केली होती जी उच्च-गुणवत्तेची सामाईक अभियोग्यता चाचणी तसेच विशेष सामान्य विषय परीक्षा देण्यासाठी एक प्रमुख,तज्ञ,स्वायत्त चाचणी संस्था म्हणून काम करेल.
केंद्रीय विद्यापीठांसाठी परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धती सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने सीईटी तपशिलांच्या पद्धतींबाबत चर्चांच्या अनेक फेऱ्या घेतल्या.त्यानंतर, समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली.
शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केले होते की 2021 शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठांमधील प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेवर आधारित असतील परंतु COVID-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे ही योजना सुरू होऊ शकली नाही.