थोडक्यात पण महत्वाचे
- पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस
- 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये पावसाचा इशारा
- कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची व जोरदार वाऱ्यांची शक्यता
नवी दिल्ली ।
यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने चांगले गेले.पण अवकाळी पावसाने देशातील अनेक राज्यांमध्ये कहर केला आहे.असेच काहीसे सध्या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये घडत आहे.जिथे गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.आता हवामान खात्याने पुन्हा एकदा दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे 30 नोव्हेंबरपासून तामिळनाडूमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, मात्र तोपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,तामिळनाडू,पुद्दुचेरी,कराईकल,केरळ,माहे,लक्षद्वीप,कोस्टल आंध्र प्रदेश,यानाम आणि रायलसीमा या भागात पुढील 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.त्यानंतर तेथे पाऊस कमी होईल.29 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, से हवामान खात्याने म्हटले आहे.दुसरीकडे, 28 नोव्हेंबर रोजी दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.त्याचबरोबर केरळ आणि माहेमध्ये २८ आणि २९ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.यासोबतच ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यादरम्यान,या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्याचवेळी अंदमान समुद्रात 29 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने अंदमान निकोबारमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानेही समुद्राला सतर्कतेचा इशारा दिला आहे.विभागाने म्हटले आहे की 28 नोव्हेंबर रोजी मन्नारच्या उपसागरात,तामिळनाडूच्या दक्षिणेकडील किनारी प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात खूप वेगाने वारे वाहतील.त्यांचा वेग ताशी 60 किमी असू शकतो. अशा स्थितीत 1 डिसेंबरपर्यंत मच्छिमारांनी या भागात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.