आंदोलनाची यापुढची भूमिका कामगारांनी ठरवावी- सदाभाऊ खोत
मुंबई ।
आंदोलन हे कामगारांनी उभे केले आहे. यामुळे त्याविषयीचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन आहे.या दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचे आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत.बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे,याचा निर्णय कामगारांनी घ्यावा, अशी घोषणा आज पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांनी केली आहे.यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते.
दरम्यान,यावेळेस एसटी कर्मचार्यांचा हा ऐतिहासिक लढा होता पण पुढील निर्णय हा कर्मचार्यांनी घ्यायचा आहे.त्यांच्यावर आमचा कोणताही दबाव नसेल असे नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
राज्यातील एसटी कामगारांनी हे आंदोलन सुरु केले आहे.आम्ही दोन लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.वेळेत पगार दिला पाहिजे,सातवा वेतन आयोगाप्रमाने वेतन मिळाले,अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती.सरकारने याकडे लक्ष दिले नव्हते त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती.न्यायालयीन लढा वकील लढत आहेत तोपर्यंत सरकारने तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.हा पहिला टप्पा आहे.१७ हजारांपर्यंत पगार मिळणाऱ्या कामगारांना २४ हजारांपर्यंत पगार गेला आहे.ज्या कामगारांना २३ हजार मिळत होता.त्यांना २८ हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
कामगारांचे हे महत्वाचे यश आहे,असे मी समजतो.मूळ वेतनात ही वाढ झाली आहे.ही वाढ अनेकवर्षे झाले तरी देखील करण्यात आली नव्हती.कामगारांचा हा पहिल्या टप्प्यातला विजय आहे.प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या अगोदर पगार देण्याला सरकार बांधील राहणार आहे,अशी सरकारची भूमिका आहे.एका बाजूला विलीनीकरणाचा आमचा लढा सुरुच राहणार आहे दुसऱ्या बाजूला सरकार दोन पावले पुढे आले आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही दुसरा टप्प्यातला लढा देखील उभा करु.सर्व कामगारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.सरकारने कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जे जे कामगार कामावर हजर राहणार आहेत,त्यांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.