रक्षकच झाला भक्षक;पोलिस खात्याला काळीमा फासला
सांगली ।
इस्लामपूर येथील पोलिस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (३४ रा.राजेबागेश्वर) याने महाविद्यालयीन तरुणास त्याचे गर्लफ्रेंड सोबतचे संबंध उघडकीस आणण्याची धमकी देत व पैशाची मागणी करत अनैसर्गिक अत्याचार केला.या अनैसर्गिक कृत्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली.पोलिसी खात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या प्रकाराची व्हिडिओ क्लीप तयार करुन ती व्हायरल करण्याची धमकी देत त्या विद्यार्थ्याकडे पुन्हा अशा कृत्याची मागणी केल्यानंतर या विद्यार्थ्याने पोलिसांत धाव घेतली.त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी घडला होता.
उपअधीक्षक पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की.दि. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता पीडित विद्यार्थी हा आपल्या गर्लफ्रेंडला भेटून रुमवर चालला होता.त्यावेळी नाईट राऊंडला असलेला पोलीस हणमंत देवकर व त्याच्या साथीदाराने त्याला अडविले.त्याच्याकडे पुर्ण चौकशी करुन त्याचा मोबाइल नंबर घेवून त्याला सोडून दिले.
पोलीस कर्मचाऱ्याचा विकृतीचा कळस
त्यानंतर २९ ऑक्टोबरला तो तरुण ज्या महाविद्यालयात शिकत होता,त्या महाविद्यालयाच्या गेटजवळ जात पोलिस कर्मचारी हणमंत देवकर याने त्या तरुणास फोन करून भेटायला येण्यास सांगितले.सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधित तरुण पोलिसांना भेटला.त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे प्रेमप्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली.त्यावर त्या तरुणाने आपल्या मित्रांकडून ४ हजार रुपये उसने घेवून देवकर याला दिले.तेव्ह्ढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दें,तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितले. संबंधीत तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.त्यावर देवकर याने तु तसे न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन असे सांगितले त्यावर संबधीत तरुण घाबरला.
व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी
देवकर याने त्याला त्याच्या वस्तीगृहातील रुमवर नेले.रूमवर असलेल्या असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले.तेथे देवकर याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले व त्याची व्हीडीओ क्लिप तयार करून तो गेला.२१ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हवलदार देवकर याने पुन्हा त्या तरुणास मोबाईलवर फोन करून महाविद्यालयाच्या गेटवर बोलावले.पुन्हा शरिरीक संबंधाची मागणी केली.तसे न केल्यास मोबाईलमधील क्लीप दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली.संबंधित तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितले.
दरम्यान,त्या विद्यार्थ्याने जिल्हाप्रमुख दीक्षित गेडाम व माझ्याकडे तक्रार केली.या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर रविवारी रात्री देवकर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.पोलिसांनी तात्काळ हवालदार देवकर याला अटक केली.देवकर याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे,खंडणी, अश्लिल क्लिप व्हायरल करणे,धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.