नवी दिल्ली |
गेल्या 24 तासात 57,54,817 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 110 (1,10,23,34,225) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 1,12,38,854 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 13,878 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,38,00,925 झाली आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.25% झाला आहे.
सलग 137 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.गेल्या 24 तासात 13,091 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,38,556 आहे, जी गेल्या 266 दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.40% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,89,470 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.99 कोटींहून (61,99,02,064) अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.18% असून गेल्या 48 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.10% असून गेले 38 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 73 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत 120 (1,20,08,58,170) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 16.74 कोटींपेक्षा अधिक (16,74,03,871) अतिरिक्त आणि न वापरलेल्या उपयुक्त मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.