Last Updated on 18 Apr 2026 8:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
वैद्यकीय आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हुबालवाडी (ता. वाळवा) प्रसिद्ध दंतवैद्य डॉ. स्वप्नील शिवाजीराव नांगरे यांची ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२६’ साठी अधिकृत निवड करण्यात आली आहे. ‘ग्लोबल इलाईट मीडिया अँड टेक’ या संस्थेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. स्वप्नील नांगरे हे ‘शिवेंदू डेंटल क्लिनिक, ऑर्थोडोंटिक अँड इम्प्लांट सेंटर’ च्या माध्यमातून ईश्वरपूर परिसरात रुग्णसेवा देत आहेत. त्यांनी दंतचिकित्सा क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपचार पद्धती आणि शाश्वत व्यवसाय वृद्धीसाठी केलेले प्रयत्न विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. नांगरे यांच्याकडे MDS (Ortho), बेसल इम्प्लांटोलॉजिस्ट आणि MBA (HR) या पदव्या असून, त्यांच्या दूरदृष्टीने वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर येथील ‘द रॉयल पॅव्हेलियन हॉटेल’ मध्ये करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना या गौरवाने सन्मानित केले जाईल.
डॉ. नांगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












































































